क्राईम न्युज

अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : परिक्षेचा पेपर देऊन दुचाकी वरून घरी परतत असलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक हा मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला आहे. अपघात लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती टायर्ससमोर पुणे–सोलापूर महामार्गावर 27 मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये तेजस संतोष साळुंखे (वय 21) व त्याचा मित्र अभय पांडे ( वय २१) हे जखमी झाले आहे.

याप्रकरणी तेजसचे काका संभाजी सुरेश साळुंखे (वय 37, मांजरी खुर्द, ता. हवेली)) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस साळुंखे हा लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बी.कॉम अंतिम वर्षाचा पेपर देऊन दुचाकी वरून घरी परतत होता. शिवशक्ती टायर्ससमोर पुणे–सोलापूर महामार्गावर पोहोचताच एम.एच. 12 एच.झेड. 0890 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून तेजसच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात तेजसच्या उजव्या हाताच्या पंजाला खोल जखम झाली असून चेहऱ्याच्या उजव्या बाजूस फ्रॅक्चर, हनुवटीवर जखम, छातीला मार तसेच डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याचा मित्र अभय याच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर व डोळ्याच्या वर जखम झाली आहे.

अपघातानंतर जखमींना प्रथम विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेजसची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील जहांगीर रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघात झाल्यानंतर कार चालक जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला आहे. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??