क्राईम न्युजजिल्हा

स्वर्ग लॉजवर पोलिसांचा छापा ; अनैतिक धंदा उघड, ४ महिलांची सुटका

पुणे क्राईम ब्रांचची धडक कारवाई ; वेश्या व्यवसायातून ४ महिलांची सुटका, ३ आरोपी जेरबंद

पुणे : शहरात अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसायाविरोधात पुणे क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत चार महिलांची सुटका केली असून तीन आरोपींना अटक केली आहे. रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत देण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), गुन्हे शाखा, पुणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नन्हे परिसरातील एका लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच “स्वर्ग एक्सोटिक पॅराडाईज लॉज” येथे अचानक छापा टाकण्यात आला.

या धाडीत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच अभिषेक दिलीप गवळी (वय २४, रा. खेड शिवापूर), रामू सांडू देवकर (वय २४, रा. सिंहगड रोड, पुणे) आणि महेश गणेश नागणे (वय ३४, रा. नन्हे गाव, पुणे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

सदर प्रकरणी नन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक नियोजन आणि समन्वय साधत ही यशस्वी मोहीम पार पाडली.

दरम्यान, पुण्यात अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई करत गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे सांगितले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??