जिल्हाराजकीयसामाजिक

अतिक्रमण नियमितीकरण व पानंद रस्ते निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा ; बावनकुळे यांचा सत्कार…

डाँ गजानन टिंगरे 

पुणे : राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, शहरी व ग्रामीण भागातील २०११ पर्यंतची १५०० चौ. फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्वतःची जागा नसल्याने घरकुल योजनांचा लाभ घेऊ न शकलेल्या गरीब व गरजू नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच या निर्णयामुळे ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा महसूल वाढून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात शेतीसंदर्भातील सर्वाधिक वाद पानंद रस्ते अडवल्यामुळे निर्माण होत होते. यावर शासनाने कठोर निर्णय घेतला असून, पानंद रस्ता अडवल्यास तहसीलदारांनी सात दिवसांच्या आत पाहणी करून कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, रस्ता अडवणाऱ्या संबंधित व्यक्तीचे सर्व शासकीय लाभ बंद करण्यात येणार असून त्याचा फार्मर आयडी देखील रद्द करण्यात येणार आहे.

या दोन्ही ऐतिहासिक निर्णयांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ओबीसी मोर्चा, पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दौंडचे आमदार राहुल कूल, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, पांडुरंग कचरे, आकाश कांबळे, तेजस देवकाते, अविनाश मोटे, संदीप आदलींग, पांडुरंग सुळ यांच्यासह अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??