क्राईम न्युज

‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीचा डाव ; लाखोंची फसवणूक, दाम्पत्य फरार…

लोणी काळभोर, ता. २४ : “नर्सरी व्यवसायात मोठा नफा मिळेल” असे आमिष दाखवत एका व्यावसायिकासह अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्याचा भांडाफोड झाला असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीनंतर संबंधित दाम्पत्य फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. सिद्राममळा, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर लक्ष्मण साठे (वय ३५) व त्याची पत्नी अर्चना किशोर साठे (वय २६, रा. सोरतापवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैनजांगडे यांच्या ओळखीतील किशोर साठे याने ऑक्टोबर २०२५ मध्ये “नर्सरी व्यवसाय” सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. “तुमच्या पत्नीला नर्सरीचा अनुभव असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरेल,” असे सांगून साठे याने त्यांचा विश्वास संपादन केला.

या आमिषाला भुलून जैनजांगडे यांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन लाख रुपये धनादेशाद्वारे तसेच दोन लाख रुपये रोख स्वरूपात साठे याला दिले. काही दिवसांत व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर साठे वेळ काढत टाळाटाळ करत राहिला.

पैसे परत मागितल्यानंतर साठे याने डिसेंबर २०२५ मध्ये २ लाख २० हजार रुपयांचा धनादेश दिला; मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर वटला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैनजांगडे यांनी पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, अधिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून, साठे दाम्पत्याने केवळ जैनजांगडे यांनाच नव्हे, तर परिसरातील अनेक नागरिकांना वेगवेगळ्या व्यवसायांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फकिर इनामदार, परविंदर दिगवा, लकी दिगवा, बाळासाहेब म्हेत्रे यांच्यासह इतर काही जणही या घोटाळ्याचे बळी ठरल्याची माहिती पुढे आली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून किशोर साठेअर्चना साठे यांचे मोबाईल फोन बंद असून, त्यांनी पुणे शहर सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, “जलद नफा” या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले असून, अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणांपासून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??