जिल्हाशिक्षणसामाजिक

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विजेतेपद ; एमआयटी-एडीटी क्रिकेट स्पर्धेत मिटकॉमवर ४१ धावांनी मात…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोणी काळभोर येथे एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठात रंगलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, लोहगाव (पुणे) संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम), लोणी काळभोर संघावर ४१ धावांनी मात करत स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली.

संस्थेचे कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १६५ धावांची भक्कम उभारणी केली. दिव्यांश (३७) व संग्राम घुमरे (३२) यांनी संघाला मजबूत आधार दिला. प्रत्युत्तरात एमआयटी मिटकॉम संघाला १७ षटकांत सर्वबाद १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली.

विजेत्या संघाकडून सफल घिमिरे याने अष्टपैलू खेळ करत ४ बळी घेतले आणि ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला. तर स्पर्धेत एकूण ९ विकेट्स घेणाऱ्या अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पुरंजय सिंह राठोड याला ‘मालिका वीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे संघाने एमआयटी स्कूल ऑफ कम्प्युटिंग (एसओसी), लोणी काळभोर संघावर १७ धावांनी विजय मिळवला. आर्मी संघाने ९५ धावा केल्यानंतर एमआयटी एसओसी संघ ७७ धावांवर गारद झाला. या सामन्यात चरण कुमार डोक्कारी याने उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीर पुरस्कार मिळवला.

२३ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. विजेते व उपविजेते संघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके, चषक, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्यास कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. पद्माकर फड, ब्रिगेडीअर मंगेश विटेकर यांची उपस्थिती होती.

एकूणच, स्पर्धेतील रोमांचक सामने, खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा क्रीडा महोत्सव यशस्वी ठरला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??