क्राईम न्युज

कळंब (ता. इंदापूर) येथे घरफोडी ; वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई, १९.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त…

डाँ. गजानन टिंगरे 

इंदापूर (पुणे) : कळंब येथील डोंबाळे वस्तीमध्ये नुकत्याच घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा वालचंदनगर पोलिसांनी जलद तपास करत पर्दाफाश केला असून, आरोपीस अटक करून तब्बल १९ लाख ७१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवार (दि. २७) रोजी श्री संत बाळूमामा पालखी मुक्कामासाठी कळंब गावात आल्याने गावातील बहुतांश नागरिक आरतीसाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका घरात घुसून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान भवानीनगर परिसरात एक संशयित इसम बिनपावतीचे सोने विक्रीसंदर्भात चौकशी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भवानीनगर-लाकडी रस्त्यावर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील (रा. पुनगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असल्याचे सांगितले.

सखोल चौकशीत आरोपीने कळंब येथील डोंबाळे वस्तीवरील घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून १६ लाख १८ हजार ५०० रुपये किमतीचे ११.५ तोळे सोन्याचे दागिने, ३ लाख ७८ हजार १०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा एकूण १९ लाख ७१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किर्तीलाल गायकवाड, दादासाहेब डोईफोडे, स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे तसेच पोलीस कर्मचारी विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर आणि गणेश वानकर यांनी सहभाग घेतला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??