जिल्हासामाजिक

लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट ; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला…

लोणी काळभोर, (ता. हवेली) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात मंगळवारी (ता. ५) सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू असतानाच टाकीत साचलेल्या ज्वलनशील वायूमुळे अचानक स्फोट होऊन एक कामगार गंभीररीत्या भाजला.

जखमीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारत वेल्डिंग वर्क्स’ या वर्कशॉपमध्ये सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास टँकरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की शेडचे पत्रे उडून गेले आणि आसपासच्या परिसरात मोठी घबराट पसरली.

या दुर्घटनेत चांद बाबू हा कामगार गंभीर जखमी झाला. स्फोटानंतर तो शेडखाली अडकला होता. घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, अजय मोरे, अनिरुद्ध मराठे आणि रामा काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत जखमीला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

स्फोटामुळे संबंधित टँकरचे मोठे नुकसान झाले असून स्फोटाचा आवाज काही अंतरापर्यंत ऐकू गेला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित टँकरचा वापर पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी केला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंच्या साठ्यामुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांनी सांगितले की, “स्फोटाची तीव्रता अत्यंत भीषण होती. टँकरचा पुढील भाग पूर्णतः जळून गेला असून स्फोटामुळे कामगार वर उडून पडल्याने त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. त्याला तातडीने सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.”

दरम्यान, या घटनेमुळे औद्योगिक कामकाजादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन किती आवश्यक आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे. स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणांनी घटनेची दखल घेत सखोल चौकशी सुरू केली असून, निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??