क्राईम न्युज

कदमवाकवस्तीत अवैध दारूचा मोठा पर्दाफाश ; आई-मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कवडीपाट (दि.५) परिसरात लोणी काळभोर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैध गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा उघडकीस आला असून तब्बल ३५० लिटर रसायनमिश्रित दारू नष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी आई-मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कवडीपाट-कदमवाकवस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. अक्षय बजरंग मुळेकर (वय २४), त्याची आई मंदा मुळेकर (वय ४७) आणि दादा खलसे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रविण दडस यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दत्त पार्क परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान अक्षय मुळेकर आणि मंदा मुळेकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३५ लिटर क्षमतेच्या १० प्लास्टिक कॅनमध्ये साठवलेली उग्र वासाची गावठी दारू जप्त करण्यात आली.

प्राथमिक तपासात ही दारू रसायन मिसळून तयार करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले असून ती मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. कॅनमधील द्रवातून तीव्र आंबट वास येत असल्याचेही निदर्शनास आले. यातील १८० मिली दारू नमुन्यासाठी जप्त करण्यात आली असून उर्वरित सर्व दारू पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आली.

दरम्यान, आरोपींनी ही दारू दादा खलसे याच्याकडून विकत आणल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचाही समावेश करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई), ५, ६६, ८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडक कारवाईमुळे नागरिकांत समाधान…

लोणी काळभोर परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी उचललेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??