जिल्हासामाजिक

लोणी काळभोर पोलिसांकडून १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत ; नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद…

लोणी काळभोर (ता. हवेली) : चोरीस गेलेला किंमती ऐवज, हरवलेले मोबाईल तसेच विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करून लोणी काळभोर पोलिसांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

आपला हरवलेला ऐवज पुन्हा हाती मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लोणी काळभोर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ७) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुद्देमाल वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे (लोणी काळभोर), अमोल मोरे (फुरसुंगी), बाबासाहेब निकम (मांजरी) यांच्यासह पोलीस हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, बापू वाघमोडे पोलीस अमंलदार योगेश पाटील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोने, १ लाख रुपयांचे चांदीचे दागिने तसेच सव्वादोन लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल फोन यांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषण, कसून तपास आणि सतर्कतेमुळे हा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. वडकी येथील राहू खंडू मोडक यांना ९.३६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, तर कवडीपाट टोलनाका परिसरातील किसन बबन इंगळे यांना ३ ग्रॅम सोने व चांदीच्या पट्ट्या परत देण्यात आल्या.

कदमवाकवस्ती परिसरातील घरफोडी प्रकरणात आरोपीला अटक करून पोलिसांनी तीन तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले होते. हा मुद्देमाल मूळ मालक शांती शंकर सोलंखी यांना सुपूर्त करण्यात आला.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी अथवा गहाळ झालेले मोबाईल फोनही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले. सुमारे एक लाख रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन एकनाथ सोपान मेमाणे, रतनमाला नंदकुमार बोराटे, रमेश रामचंद्र जुगदळ, रेवती रमा गुप्ता, साजीद तांबोळी आणि दत्तात्रय ज्ञानोबा कोतवाल यांना परत करण्यात आले.

फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २०२५ मधील मोठ्या घरफोडीचा छडा लावत पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी आरोपीला अटक केली होती. या कारवाईत चोरीस गेलेले ५ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. हे दागिने मूळ मालक अभिजित मधुकर पठारे (रा. होळकरवाडी, ता. हवेली) यांना परत देण्यात आले. तसेच हरवलेले चार मोबाईल फोन शोधून मुस्कान जाधव, शाम मिसाळ, अक्षय कारंडे आणि सुधीर खताळ यांनाही सुपूर्त करण्यात आले. गुन्ह्यांचा छडा लावत नागरिकांचा विश्वास जपणाऱ्या लोणी काळभोर आणि फुरसुंगी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??