जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गुरुवर्यांच्या समर्थनार्थ संताप ; राष्ट्रवादीचे विकास लवांडेंवर शाईफेक…

वारकरी संप्रदायाची नाराजी भोवली? राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं, ते आमचं सर्वस्व आहे,” असे म्हणत काही जणांनी त्यांना अडवून शाईफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशक्रिया विधीनिमित्त आयोजित कार्यक्रम आटोपून लवांडे परतत असताना निर्जनस्थळी काही जणांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी वारकरी संप्रदायाशी संबंधित संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचा दावा करण्यात आला आहे. “परत जर आमच्या गुरुवर्यांविषयी काही बोलला तर लक्षात ठेव,” अशी धमकी देत मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.

घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये काही जण लवांडे यांना घेराव घालताना दिसत आहेत. या प्रकारानंतर वारकरी संप्रदायातील काही घटकांकडून लवांडे यांच्या वक्तव्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि व्हिडिओची सत्यता याबाबत तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??