जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

प्लॉटिंग व्यावसायिकांचे कारनामे – भाग १ पूर्व हवेलीतील प्लॉटिंगमध्ये नियमांचा फज्जा शासन व ग्राहकांची दिशाभूल…!

कदमवाकवस्ती (हवेली) : पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या हद्दीतील पूर्व हवेली परिसरात काही प्लॉटिंग व्यावसायिकांनी शासनाच्या नियमांचा भंग करत ग्राहकांची फसवणूक केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. कलेक्टर एनए किंवा पीएमआरडीए सॅन्क्शन प्लॉट असल्याचे भासवून हे व्यावसायिक बेकायदेशीररीत्या प्लॉट विक्री करत असून शासनाचे आणि प्राधिकरणाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महसूल विभागपीएमआरडीएने या गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक क्षेत्रातुन होत आहे.

१० टक्के ओपन स्पेसचा नियम फोल ठरताना!

पीएमआरडीएच्या नियमांनुसार शहरी भागातील जमिनीचे प्लॉटिंग करताना एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के जागा ओपन स्पेस म्हणून राखून ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही व्यावसायिक कमी किमतीत जमीन खरेदी करून ती अनेक भागीदारांच्या नावावर विभागतात आणि शासनाची दिशाभूल करून वेगवेगळे लेआउट सॅन्क्शन करून घेतात. नंतर हे लेआउट एकत्र करून विक्री केली जाते.

या प्रकारात ओपन स्पेसचा नियम पायदळी तुडवून, राखीव जागा सुद्धा विकली जाते. शासनाच्या नियमानुसार मोकळी जागा विकता येत नाही किंवा त्यावर इमारत बांधता येत नाही — तरीदेखील मोठ्या प्रमाणावर हा प्रकार घडत आहे.

UDCPR कायद्याचा गैरवापर…

युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन (UDCPR) नुसार, वाघोळी सारख्या ठिकाणी ४० गुंठ्यांपेक्षा मोठ्या प्लॉटसाठी १० टक्के ओपन स्पेस ठेवणे बंधनकारक आहे, तर पीएमआरडीएच्या हद्दीत उरुळी कांचन, थेऊर, आळंदी म्हातोबा, लोणी काळभोर या भागांत २० गुंठ्यांपेक्षा मोठ्या प्लॉटसाठी ही अट लागू आहे.

तथापि, नियमांपासून बचाव करण्यासाठी व्यावसायिक ३–४ भागीदारांच्या नावावर छोटे प्लॉट दाखवून सॅन्क्शन घेतात; पण प्रत्यक्षात हे सर्व प्लॉट एकत्रितपणे विकसित करून एकाच नावाने विक्री करतात.

ग्राहकांची आर्थिक फसवणूक व शासनाचा महसूल बुडवला जातो का?

रस्ते, कंपाउंड, वीज, पाणीपुरवठा या सर्व सुविधा एकत्र करून “सिंगल प्रोजेक्ट” म्हणून सादर केल्या जातात. परिणामी, ग्राहक ओपन स्पेसच्या नावाखाली फसतात आणि शासनाचा महसूल बुडतो.

याबाबत न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, मंजूर आराखड्यातील ओपन स्पेस कोणालाही विकता येत नाही, ती सर्व प्लॉटधारकांची सामाईक मालमत्ता असते.

प्लॉट धारक संघटित न झाल्याने गैरप्रकार वाढले…

विकसक ओपन स्पेस व ॲमिनिटी स्पेससुद्धा विकून टाकतात. प्लॉटधारक एकत्र येत नाहीत, त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसत नाही. विकास नियंत्रण नियमांनुसार मोकळी जागा सोडणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शहरातील गर्दी, प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो.

पुणे परिसरातील वाढते दर आणि प्लॉटिंग व्यावसायिकांची मनमानी यामुळे शासन व ग्राहक दोघांचेही मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि पीएमआरडीएने अशा प्लॉटिंग प्रकल्पांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करणे गरजेचे ठरत आहे. अशी चर्चा नागरिकांमधून दबक्या आवाजात होत आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??