श्री विनायक प्रतिष्ठान ट्रस्टच्या छत्रपती ग्रुपचा गणेशोत्सव थाटात संपन्न..
१८ वर्षांची परंपरा जपत विविध सामाजिक उपक्रम ; विसर्जन मिरवणुकीत अजितदादा पवार यांच्या आठवणीतील गीतातून अनोखी श्रद्धांजली...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कवडीपाट येथील श्री विनायक प्रतिष्ठान ट्रस्ट, २००८ पासून छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे आयोजन करत असून यंदा या उत्सवाला १८ वर्षे पूर्ण झाली. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरेचा संगम साधत दरवर्षी विविध उपक्रम राबविणाऱ्या छत्रपती ग्रुपचा गणेशोत्सव यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशस्थापनेपासून ते सातव्या दिवशी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाच्या गणेशमूर्तीची स्थापना सुवर्णा संजय जगन्नाथ गुजर आणि संगीता बाबासाहेब ज्ञानोबा गुजर यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, संगीत खुर्ची यांसह विविध सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांचा आणि परिसरातील गणेशभक्तांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात ही मिरवणूक पार पडली.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणीतील गीत लावून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगामुळे मिरवणुकीत भावनिक वातावरण निर्माण झाले.
विसर्जनापूर्वीच्या आरती सोहळ्यास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, वानवडी वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तसेच क्राईम पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
यावेळी विशाल गुजर व संजय गुजर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास API सतीश गोडसे, API सोमनाथ नाळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, हवालदार रवी आहेर, बापू वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांचाही विशाल गुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे विसर्जन मिरवणुकीत शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण राहिले.
या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी मंडळाचे मार्गदर्शक संजय गुजर, शेखर काळभोर आणि हभप सुशील महाराज काळभोर, बाबासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर अध्यक्ष विशाल गुजर यांच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विशाल गुजर, सह, राज गुजर, वैभव गुजर, शुभम सांगळे, बाळासाहेब कांबळे, महेश माने, रवी आम्ररुते, अमोल भोसले, प्रदीप गुजर, अभिजित गुजर, दिपक बारस्कर, आसीफ सय्यद, प्रज्वल गुजर, सौरव गुजर यांच्यासह छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रमांची सांगड घालत १८ वर्षांची परंपरा जपणाऱ्या श्री विनायक प्रतिष्ठान ट्रस्ट, छत्रपती ग्रुपचा यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय, सामाजिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात थाटात संपन्न झाला.
Editer sunil thorat




