गुजरवस्तीत पारंपरिक बैलपोळा उत्साहात साजरा ; गुजर बंधूंसह मित्र परिवाराचा पुढाकार!
कवडीपाट टोलनाका परिसरात सलग दुसऱ्या वर्षी बैलपोळ्याचा उत्साह; परंपरा जपण्यासह शेतकरी संस्कृतीचा जागर!

कदमवाकवस्ती (ता.हवेली) : कदमवाकवस्ती येथील कवडीपाट टोलनाका परिसरातील गुजरवस्ती येथे मागील दोन वर्षांपासून पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाही हा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत बैलपोळा सणाला विशेष महत्त्व असून, शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. या परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने गुजरवस्तीतील गाडामालक, राज शेठ गुजर व युवक आणि मित्रपरिवाराने एकत्र येत बैलपोळ्याचे आयोजन केले.
गाडामालक राज शेठ गुजर, शंभू फॅन क्लब आणि छत्रपती ग्रुप संस्थापक अध्यक्ष विशाल गुजर यांच्या पुढाकारातून राज गुजर, प्रज्वल गुजर, सौरव गुजर, व सहकारी मित्र परिवाराच्या सहभागातून या उपक्रमाला उत्साह मिळाला. पारंपरिक सणाच्या माध्यमातून परिसरातील युवकांनी एकत्र येत सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
या आयोजनात हभप सुशील महाराज काळभोर, बाबासाहेब चव्हाण, नितीन टिळेकर, वैभव गुजर, अभी गुजर, प्रदीप गुजर, पवन गुजर, आसिफ सय्यद, अमोल भोसले, बाळासाहेब कांबळे, शुभम कदम, अभिषेक पासलकर, सुरज कदम, अभिजीत बारस्कर, नाना माने, शुभम सांगळे, ओमकार सांगळे, सुजल चव्हाण, चैतन्य हरपळे, करण लाडके, तुकाराम कुंभार, इरफान मजकुरी, रवीशेठ अमृते, आदित्य वाघुले, हर्षद पुणेकर, विक्रम कळवंडे, समर्थ पांचाळ, श्रीराम भोसले, सार्थक चव्हाण, यश भोसले, यश निकाळजे, सिद्धू डोईफोडे, सचिन सांगळे आणि बुवा खरात यांच्यासह मित्र परिवाराने सहभाग घेतला.
पारंपरिक सणांच्या माध्यमातून एकजूट, संस्कृती आणि शेतकरी जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे, हा या आयोजनामागील महत्त्वाचा उद्देश आहे. गुजरवस्तीतील बैलपोळा उत्सवाच्या निमित्ताने परिसरात पारंपरिक सणांचा उत्साह पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
Editer sunil thorat




