महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणालीद्वारे वाहनावर नजर..

सुनिल थोरात

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रीम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे.
           पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा ६० किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ४० किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा १०० किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ८० किमी प्रतितास आहे.
           प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे. तरी सर्व वाहन धारकांनी वाहतूक करतांना सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत वाहनधारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??