सामाजिक

‘शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद महत्त्वाची‘ ; रिक्षा चालक सविता कुंभार..

मेरी राते, मेरी सडके कार्यक्रमात मांडले परखड मत..

सुनिल थोरात (प्रतिनिधी) 
पुणे : कुठल्याही प्रकारचे काम करण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिकरित्या खंबीर असणं महत्वाचं असतं मग त्यात तुम्ही पुरुष आहेत की महिला हा फरक नगण्य ठरतो असं परखड मत रिक्षा चालक सविता कुंभार यांनी मांडले.
महिला जागर समिती आयोजित मेरी रातें, मेरी सड़कें उपक्रमा अंतर्गत चाकोरी तोडणाऱ्या महिलांचा सन्मान या उपक्रमाच्या सातव्या रात्री कुंभार बोलत होत्या. शनिवारी येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात ‘मेरी राते, मेरी सडके’ हा महिला सन्मानाचा कार्यक्रम झाला.

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही जिद्दीच्या जोरावर पारंपरिक चौकटीला भेद देत महावितरणमध्ये वायरवूमन बनलेल्या अर्पणा काळे, चहाची टपरी चालवत मुलीला डॉक्टर करणाऱ्या जुलेखा युसुफ शेख, उजनी प्रकल्पग्रस्तांसाठी झटणाऱ्या महिला शेतकरी दीपाली वगरे, योगा शिकविणाऱ्या मालन पवार, पुणे महानगर परिवहन मंडळातील कंडक्टर हेमलता भोये यांचा सन्मान करण्यात आले.
       यावेळी कोरेगाव पार्कच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व जागर समितीचे संयोजक उपस्थित होते. यावेळी रुणाल मुल्ला म्हणाल्या, “समाजाला तोंड देत एखाद्या महिलेने नोकरी करत संसाराची जबाबदारी सांभाळत स्वाभिमानाने जगणं हे खूप आव्हानात्मक असतं हे आव्हान सांभाळण्यासाठी व्यक्तीचं मन खूप मजबूत असावे लागते.”
     विविध क्षेत्रात महिला हळूहळू पण हिमतीने आपलं स्थान बळकट करत आहेत अशा चाकोरी तोडणाऱ्या महिलांच्या अनुभवातून, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यांतून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा या उपक्रमा मागील उद्देश असल्याचे संयोजक ॲड. असुंता पारधे यांनी सांगितले. सीवायडीएच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेषतः मुलींनी ‘पहाडोसी बन रही है लडकीया‘ हे गाणं घेऊन उपस्थितांची दाद मिळवली.
                                   यावेळी ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रियंका रणपिसे, दिशा संस्थेच्या पौर्णिमा गादिया, भटक्या विमुक्तांमध्ये काम करणाऱ्या शारदा खोमणे, निर्भय विद्यार्थी अभियानाच्या सुलभा क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.                                                             कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते अकबर खान, इमाम शेख, अन्वर पठाण, डॅनिअल लांडगे, अजित गंगावणे, जार्ज स्वामी, उद्योजक गणेश बाबर यांनी सहकार्य केले. नीलिमा तारा सुरेश यांनी सूत्रसंचालन केले तर दिलीप कुऱ्हाडे यांनी आभार मानले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??