महाराष्ट्रराजकीयसामाजिक

नागरिकांसाठी, लोकनेते नगरसेवक योगेश ससाणे यांचे १५ दिवसांपासून सह्यांची मोहीम सुरु…

निर्णय हा मागल्या दाराने खाजगीकरणाच्या दिशेने ; लोकनेते योगेश ससाणे.

पुणे (हडपसर) : हडपसर येथील ग्लायडीग सेंटर बाबत गेल्या दोन वर्षापासून ९९ वर्षाच्या करारावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेली १५ दिवस नगरसेवक योगेश ससाणे हे नागरिकांसह रस्त्यावर उतरून सह्यांची मोहीम राबविली.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला १ रुपये नाममात्र भाड्यावर ९९ वर्षाच्या कराराने PPP मॉडेल वर सदरची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदरचा निर्णय हा मागल्या दाराने खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे. १८७ रुपये नाममात्र पैशामध्ये एकदा ग्लायडर विमानामध्ये बसता येतं व ज्यांना वैमानिक व्हायचा आहे त्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांना ४० ते ५० हजार रुपये मध्ये वैमानिक होता येते. या ठिकाणी आता ते शक्य होणार नाही. यामुळे लोकनेते, जनसेवा योगेश बापू ससाणे उपोषणाच्या माध्यमातून हडपसर व पुणे शहराच्या आसपासच्या नागरिकांना सही करून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहेत.

परंतु PPP मॉडेल वरती हस्तांतरित झाल्यास सदरचा १८७ रुपये दर बंद होऊन तो कितीही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुला -मुलींना ग्लायडर वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भविष्यात लाखो रुपये मोजावे लागतील,

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टकार्ड च्या माध्यमातून आवाहन.

म्हणून या निर्णयाविरोधामध्ये जवळपास ६००० पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या असून २५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पोस्टकार्ड पत्र तयार करून पाठवली आहेत.

                 नगरसेवक योगेश ससाणे.

याचाच एक भाग म्हणून  (दि.०५) तारखेला लाक्षणिक उपोषण माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केले. सदरचे उपोषण ग्राइंडिंग सेंटर मेन गेट पुणे सासवड रोड या ठिकाणी सकाळी करण्यात आले. तरी पुणे, हडपसर पंचक्रोशीतील नागरिकांनी या ठिकाणी येऊन उपोषणाच्या ठिकाणी येऊन सही करून सदर गोष्टीचा निषेध नोंदवावा तसेच मानवी साखळी करून या निर्णयाविरोधात असलेला विरोध दर्शवावा असे आवाहन लोकनेते, योगेश दत्तात्रय ससाणे यांनी केले आह.

याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या विषयांमध्ये विरोध करणारे माजी नगरसेवक योगेश ससाणे आणि सोपान घोगरे यांनी आज केले , सदरचे उपोषण हे उद्या ग्ग्लडीग सेंटर च्या मेन गेट पुणे सासवड रोड या ठिकाणी सकाळी ८ वाजता चालू केले. आज दिवसभरात हडपसर पंचक्रोशीतील सुमारे १००० पेक्षा जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन उपोषणाच्या ठिकाणी येऊन सही करून सदर गोष्टीचा निषेध नोंदवला आहे .

आज मानवी साखळी करून या निर्णयाविरोधात असलेला विरोध दर्शविला. ग्लायडीग सेंटर चे कॅप्टन शैलेश चारभे सरांना आज सायंकाळी ६ वाजता मागणीचे निवेदन दिले. या वेळी सोबत सोपान घोगरे, गणेश बोराटे, संजय आमंदे, सुरेश हिंगणे , अजित ससाणे, अभिजित घाडगे, बाबा भाडळे, विकास चोरघे, शरद तरडे, मोहन बलाई, संदीप कुंजीर, इत्यादी व असंख्य नागरीक उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??