क्राईम न्युजमहाराष्ट्र

पुणे स्टेशन, सेतू केंद्रातून दोन महिला संगणक चालकांना भूमिहीन दाखल्याची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले..

हवेली तहसील कचेरी अंतर्गत सेतू केंद्राचा कारभार ; सेतू केंद्रात मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचा संशय..; मोठे मासे सापडण्याची शक्यता तक्रारदार..

डॉ. गजानन टिंगरे

पुणे (हवेली) : भूमिहीन दाखल्यासाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४०० रुपयांची लाच स्वीकारताना हवेली अप्पर तहसील कार्यालयातील दोन महिला संगणक चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई पुणे सेतू येथे शुक्रवारी (ता.३१, जानेवारी) केली आहे. या कारवाईमुळे शासन मान्य सेतू केंद्रात मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा दाट संशय असून प्रत्येक व्यक्तीला कंम्पलसरी पैशाची मागणी केली जाते. या सर्व पैशाचे कलेक्शन कोण पाहत आहे.? कोणाला याचा आर्थिक फायदा होत होत आहे.? तहसीलदार कचेरी येथील कोणाचा यामध्ये सहभाग आहे का? तहसील कचेरी या कारवाईची गंभीर दखल घेणार का? नागरिकांकडून शासन व्यतिरिक्त पैसे घेतल्यावर सेतू केंद्रात कोणकोण वाटेकरी आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळावीत असे तक्रारदार यांनी म्हटले आहे.

या घटनेने हवेली महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून या घटनेची परिसरात माहिती वार्याच्या वेगाने पसरली. या घटने नंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वंदना दिनेश शिंदे (वय ५०), जयश्री रोहिदास पवार (वय ४५, दोघी नेमणूक सेतू कार्यालय, अप्पर तहसिल कार्यालय हवेली, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला संगणक चालकांची नावे आहेत. या प्रकरणी ४८ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी भुमिहीन असल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी रितसर अर्ज अप्पर तहसिल कार्यालय हवेली, पुणे येथे सादर केला होता. त्यानुसार तक्रारदार यांचा भुमिहीन असल्याबाबतचा दाखला देण्यासाठी पुणे स्टेशन सेतू कार्यालय, अप्पर तहसिल कार्यालय हवेली, पुणे येथील इतर लोकसेवक वंदना शिंदे यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व तडजोडीअंती ४०० रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, संगणक चालक असलेल्या इतर लोकसेवक वंदना शिंदे यांनी तक्रारदार यांना भूमिहीन असल्याबाबतचा दाखला देण्यासाठी शासकीय शुल्क 34 रुपयांच्या व्यतिरिक्त 400 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व ही लाच स्वीकारताना वंदना शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. व इतर लोकसेवक जयश्री पवार यांनी सदर लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे दोघींच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, सहकारी पोलीस शेलार, पवार मॅडम यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??