सामाजिक

प्राचीन मंदिराचे सप्तभूमीज शिखर पाण्याबाहेर, प्रतिदिन १० सहस्र क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू असल्याने, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने ; पळसदेव

डॉ गजानन टिगरे

पुणे (इंदापूर) : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असलेल्या पळसदेव येथील श्री पळसनाथांच्या प्राचीन मंदिराचे सप्तभूमीज शिखर पाण्याबाहेर आले आहे.

गेल्या वर्षी हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. उजनी धरणाच्या बांधणीनंतर वर्ष १९७५ मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली. त्यानंतर २४ वर्षांनी म्हणजे वर्ष २००२ मध्ये मंदिर प्रथमच पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. त्यानंतर वर्ष २०१३, वर्ष २०१७, वर्ष २०२३, वर्ष २०२४ मध्ये मंदिर पाण्याबाहेर आले होते. सीना माढा, दहीगाव, बोगदा आणि मुख्य कालव्यातून पाण्याचे आवर्तन चालू आहे. प्रतिदिन १० सहस्र क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू असल्याने, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने अल्प होत आहे. पाणी सोडण्याचे प्रमाण कायम राहिल्यास आणि पाऊस न पडल्यास काही दिवसांत मंदिर पूर्णपणे बाहेर येण्याची शक्यता आहे.

पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, प्राचीन स्थापत्य कलेच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, ३ बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता आणि व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे मंदिर आहे.

मंदिर पुर्णपणे पाण्याचा बाहेर आल्यास भाविकांची दर्शनासाठी रांग लागणार यात शंका नाही…

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??