महाराष्ट्रराजकीयसामाजिक

अपशिंगे मिलिटरी : लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध गावकर्‍यांचा अविश्वास ठराव मंजूर…

वेणेगाव/अंगापूर : अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) येथे प्रथमच लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध गावकर्‍यांनी गुप्त मतदान करून अविश्वास ठराव मंजूर केला आहे. सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधातील हा ठराव 256 मतांच्या फरकाने मंजूर झाला.

शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. गावातील एकूण 3391 मतदारांपैकी 1931 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1907 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 37 मते अवैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 1063, तर विरोधात 807 मते पडली.

या मतदान प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी काम पाहिले. बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहा बुथवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

लोकनियुक्त सरपंचांविरुद्ध अशा प्रकारे गुप्त मतदानाने अविश्वास ठराव मंजूर होण्याची ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली आहे. या घटनेमुळे गावातीलच नव्हे तर तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??