क्राईम न्युज

काम करताना शिडीवरून पडून वायरमनचा मृत्यू; पोलिसांकडून ठेकेदारावर गुन्हा दाखल..

शिडीवरुन पडुन वायरमणचा मृत्यू...

पुणे: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर इलेक्ट्रिकचे (लाईट) काम करताना शिडीवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

          वडगाव शेरी येथील सैनीकवाडीमधील वृद्धावन नगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. युसूफ शेख (वय ४७, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इलेक्ट्रिक्स ठेकेदारावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युसूफ यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे. ४ जानेवारी दुपारी ही घटना घडली आहे.

            पोलिसांच्या माहितीनुसार, युसूफ शेख हे लाईट फिटींगचे काम करतात. दरम्यान, वृद्धावन नगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लाईटचे काम सुरू होते. हे काम युसूफ शेख यांच्याकडून करून घेतले जात होते. ठेकेदाराने त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. मात्र, काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेची पुरेषी काळजी घेतली गेली नाही. युसूफ हे शिडीवर उभा राहून काम करत असताना ते शिडीवरून खाली पडले. यात डोक्याच्या पाठिमागील बाजूस गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराने कामगारांच्या जिवीताची व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य ती साधने न पुरविता त्यांच्याकडून कामकरून घेतले. काम करताना त्यांचा शिडीवरून खाली पडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

         रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची तोडफोड

          पुण्यातील भारती हॉस्पिटलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

                       काय आहे प्रकरण?

डाॅ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय ३६) यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटनेवरून संबंधित नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                         घटना कशी घडली?

             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हॉस्पिटलमध्ये तेजराज जैन (वय ८६) यांचे उपचारा दरम्यान मंगळवारी (७ जानेवारी) मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदार पणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

          तोडफोड आणि धक्काबुक्कीची घटना

नातेवाईकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनी लाकडी स्टूल उचलून केबिनच्या काचांवर फेकून मारला.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??