राजकीय

‘खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’ भाजप नगरसेवकांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य,

महायुतीमध्ये मिठाचा खडा?

पुणे : पुण्यात पाच माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.

विशाल धनवडे, प्राची आल्हाट, बाळा ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या पाच माजी नगरसेवकांचा प्रवेश होत असताना एकीकडे भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेकडून सुद्धा या पाचही नगरसेवकांच्या जागेवर महापालिका निवडणुकीसाठी दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवेशाने पुणे शहरातले राजकीय वातावरण आधीच ढवळून निघालेलं असताना, या नगरसेवकांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असल्याचं वक्तव या पाचही नगरसेवकांनी एका सुरात व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे भाजप पक्ष कार्यालयातच या नगरसेवकांकडून हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे, आज या पाच माजी नगरसेवकांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत या पाच माजी शिवसैनिकांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची नसून, उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं वक्तव्य केलं आहे. नगरसेवकांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??