क्राईम न्युज

लाँन्ड्री व्यावसायिकाकडे महिन्याला पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड ; वारजे माळवाडी..

महिन्याला हप्ता दे नाही तर, मी.; पुण्यात गुंडाकडून व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण...

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारजे माळवाडी परिसरात लाँन्ड्री व्यावसायिकाकडे महिन्याला पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

        या प्रकरणी सराईतावर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सराईताने परिसरात दहशत देखील माजवली. नंतर कारची काच फोडली. याप्रकरणी ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (वय २१, रा. रामनगर, वारजे) याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका लाँन्ड्री व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

        पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराचे एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात दांगट पाटीलनगर इस्त्री आाणि कपडे धुलाईचे दुकान आहे. आरोपी वाघमारे हा तीन दिवसांपूर्वी शिवणे भागात आला. त्याच्याकडे गज होता. ‘या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी धमकी त्याने व्यावसायिकाला दिली. पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भागातील एका कारची काच फोडली.

        शिवणे भागातील दांगट पाटीलनगर परिसरात लघुउद्योजकांचे कारखाने आहेत. या भागातील आणखी एका व्यावसायिकाला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. त्याने कारखाना पेटवून देण्याची धमकी दिली. मी पोलिसांना घाबरत नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??