जिल्हाशिक्षणसामाजिक

एमआयटी एडीटी विद्यापीठ–रायन समूहात शैक्षणिक सहकार्याचा करार…

विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष, डिझाईन व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी संधी...

हवेली (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (ADT) विद्यापीठ, लोणी-काळभोर आणि रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रा. एच. के. व्यास सभागृहात दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार औपचारिकरीत्या संपन्न झाला.

या कराराचा उद्देश शालेय आणि उच्च शिक्षण यांच्यात प्रभावी शैक्षणिक दुवा निर्माण करणे हा असून, डिझाईन थिंकिंग, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रारंभिक टप्प्यात समावेश करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सहकार्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शैक्षणिक भेटी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील मेकर्स्पेस आणि इनोव्हेशन लॅब्ससारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमास रायन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद शर्मा, शैक्षणिक बाबींच्या उपाध्यक्षा निधी थापर तसेच उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख जॉन अ‍ॅलेक्स उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दंडेश्वर बिसोयी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे प्राध्यापक उपस्थित होते.

रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, २० राज्ये आणि ४० शहरांमधील १५० हून अधिक शाळांद्वारे सुमारे २.५ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा, कला आणि नेतृत्वगुणांच्या विकासावरही संस्थेचा भर असतो.

यावेळी बोलताना विनोद शर्मा म्हणाले की, “उत्कृष्ट शिक्षण हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठासोबतचे सहकार्य विद्यार्थ्यांना डिझाईन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल.”

डॉ. नचिकेत ठाकूर यांनी सांगितले की, “डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या करारातून विद्यार्थ्यांना डिझाईन-आधारित समस्या निराकरण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लवकर परिचय मिळणार आहे. बदलत्या जागतिक करिअर संधींसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.”

कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने झाली असून सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रन्शिल मल्होत्रा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??