जिल्हा

डंपर व दुचाकी अपघातात माजी मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू ; श्रेयश प्लीरा नर्सरी समोरील घटना ; सोरतापवाडी..

तुळशीराम घुसाळकर / हवेली

पुणे (हवेली) : डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका माजी मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रेयश प्लीरा नर्सरी समोर रविवारी (१९ जानेवारी) रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या घडली आहे.

        या अपघातात खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव (ता. दौंड) येथील माजी मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे (वय ५९ रा फ्लॅट नं सी – २ लक्ष्मी विहार सोसायटी हडपसर) हे मृत्युमुखी पडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, पाठीमागील भरधाव डंपर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

         याप्रकरणी भरत संतोष नांदे (वय २२, रा एकता कॉलनी आकाश ठेबे यांची रूम गजानन महाराज मंदीराजवळ, काळेपडळ हडपसर पुणे मुळ रा. राजेबोरगाव ता. जि. धाराशिव) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी बॅचच्या एका विद्यार्थिनींच्या पुस्तकाचे प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उरुळी कांचन येथे करण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना त्यांच्या एका सहशिक्षकांनी एलाईट चौकात सोडले. यावेळी नेवसे सरांनी हडपसरकडे जाणाऱ्या एका दुचाकीला लिफ्ट मागितली व दोघेजण उरुळी कांचन येथून हडपसरकडे दुचाकीवर निघाले. सोरतापवाडी येथील श्रेयश प्लीरा नर्सरी समोर आले असता त्यांच्या समोर असलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक ब्रेक दाबला व पाठीमागे बसलेलं नेवसे सर हे महामार्गावर खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेला डंपर त्यांच्या डोक्यावरून गेला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली.

       या घटनेनंतर सदर डंपर चालक फरार झाला असून त्याच्यावर भरत नांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??