जिल्हासामाजिक

बांबूच्या उद्योगांमध्ये क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता ; अजित ठाकूर.

पुणे बांबू महोत्सव-२०२५

तुळशीराम घुसाळकर / पुणे

पुणे : “पुणे बांबू फेस्टिव्हल हा केवळ उत्सव नाही; तर तो हरित आणि शाश्वत भविष्याकडे एक पाऊल आहे. बांबूमध्ये उद्योगांमध्ये क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता आहे,” असे विचार बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे संचालक अजित ठाकूर यांनी मांडले.

स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे बहुप्रतीक्षित पुणे बांबू महोत्सव २०२५ च्या तिसऱ्या हंगामाचे गुरुवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. महाराष्ट्र चॅप्टरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने व येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित हा ‘ग्रीन गोल्ड’ महोत्सव २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान रोज सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत पुणेकरांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे.

या प्रदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या प्रथम दोन प्रेक्षक नवनीता क्रिश्नन व विकी बारवकर यांच्या हस्ते फित कापून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी, बोलताना एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ डिजाईनचे संचालक डाॅ.नचिकेत ठाकूर म्हणाले, बांबू, ज्याला ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखले जाते, जगातील सर्वात वेगाने वाढणारी गवत आहे आणि टिकाव व बहुउपयोगीपणाचे प्रतीक आहे. कचरा शून्य तत्त्वावर आधारित बांबूचा उपयोग बांधकाम, हस्तकला, पर्यावरण संरक्षण आणि खाद्यपदार्थांमध्ये देखील होतो. बांबूच्या याच उपयोगीता लक्षात घेवून नवकल्पानांना प्रोत्साहित करण्यासाठी व बांबू विश्वाची लोकांना अनूभूती घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

                  इटरएक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन

या महोत्सवात नेहरू सायन्स सेंटर, मुंबईतर्फे एक इंटरएक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे हे प्रदर्शन विज्ञान व टिकाव या संकल्पनांवर आधारित शैक्षणिक आणि मनोरंजक माहिती देईल.

महोत्सवाची वैशिष्ट्ये

या फेस्टिव्हलमध्ये बांबूच्या विविध उपयोगांवर आधारित कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे:

बांबू बांधकाम आणि डिझाइन: अभिनव बांबू आर्किटेक्चरचे प्रदर्शन.
हस्तकला प्रदर्शन: सुंदर बांबू कलाकृतींचा संग्रह.
उत्पादन विक्री: योगा वियर, इनरवियर यांसारखे अनोखे बांबू उत्पादने.
बांबू लागवड आणि प्रक्रिया: बांबू उगवण्याचे व प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन.
बांबू यंत्रसामग्री: बांबू उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रात्यक्षिक.
सक्षमीकरण कार्यक्रम: महिलांसाठी आणि युवकांसाठी बांबू उपक्रमांद्वारे उद्योजकतेची संधी.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??