महाराष्ट्रराजकीय

ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार व गैरकारभार उघडकीस येण्याची दाट शक्यता ; काय प्रकार, सविस्तर बातमी वाचा…

ग्रामपंचायतीच्या ३ सदस्यांच्या तक्रारीवरून, आस्थापना पुणे विभागाचे उपआयुक्त नितीन माने यांचे चौकशीचे आदेश...

पुणे (बारामती) : बारामती तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीत सरपंचांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करून त्याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व तपासणी करून सरपंचांविरोधात कारवाई होण्या संदर्भात ३ ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सरपंच चंद्रकांत निवृत्ती तावरे यांची चौकशी करून तथ्य आढळल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 (1) नुसार कारवाई करण्या बाबत आस्थापना पुणे विभागाचे उपआयुक्त नितीन माने यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

सदस्यांनी सरपंचांबाबत केलेल्या गंभीर आरोपांमुळे सांगवी ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार व गैरकारभार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत सांगवी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विजय श्रीरंग तावरे, हनुमंतराव बाबुराव तावरे, बापूराव लक्ष्मणराव तावरे यांनी ६ जानेवारी रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ग्रामपंचायतीत सरपंचांनी मनमानी करत विश्वासात न घेता भ्रष्टाचार केल्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 (1) नुसार कारवाईची मागणी केली होती.

या तक्रारी मध्ये सन २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालाची पूर्तता वेळेवर केली नाही. कचरा डेपो जागेस कंपाउंड करण्याच्या कामाचे ई-टेंडर करणे आवश्यक असताना, ई-कोटेशन प्रक्रिया मनमानीपणे राबविली गेली, कामास ग्रामसभेची मान्यता घेतली गेली नाही, १५ व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चित ठेवला आहे. त्यामुळे विकासावर परिणाम झाला आहे, मासिक सभा आणि ग्रामसभा निमयानुसार घेतलेल्या नाहीत, ग्रामपंचायतीने नोंद वहया व लेखे नियमाप्रमाणे ठेवलेले नाहीत. यासह विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रार अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्यांची प्राथमिक चौकशी करून तक्रारीतील मुद्यांच्या अनुषंगाने चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 (1) प्रमाणे कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. सरपंच चंद्रकांत तावरे हे जानेवारी २०२१ पासून ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर काम करीत आहे, निवड झाल्यापासून त्यांनी अत्यंत बेकायदेशीरपणे कामकाज सुरु केले आहे.

ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण सन २०२२-२३ अखेर पूर्ण झालेली आहे, त्याचे अहवालही ग्रामपंचायतीला प्राप्त आहेत. परंतु महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४०(२) नुसार लेखापरीक्षक अहवाल प्राप्त झाल्यापासून तीन महिन्याच्या आत पंचायतीने लेखापरीक्षण अहवालात दाखविण्यात आलेले दोष, नियमबाह्य बाबी दूर करून तसे केल्याबाबत ग्रामपंचायतच्या ठरावासह ऑडिट शकाची पुर्तता करून त्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविले नाही. लेखापरिक्षण अहवालाची पूर्तता करणेकामी अक्षम्य दुर्लक्ष करून थकित लेखापरीक्षण अहवालाची पूर्तता झाली नाही असे लेखी तक्रारीत म्हटले आहे.

                         ठोस पुरावा उपलब्ध असल्याचा सदस्यांचा दावा…….

सरपंच यांच्या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षण अहवालाची पूर्तता नियमाप्रमाणे करण्यात आली नाही. त्यामुळे लेखापरिक्षणात उघड झालेल्या गंभीर बाबी अनियमितता, बेकायदेशीर व्यवहार, भ्रष्टाचार याबाबतीत पुढील कोणतीच कार्यवाही झाली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून कर्तव्यातील कसुरीचा व बेपरवाहीचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचा दावा या सदस्यांनी केला आहे.

                           निधी गैरमार्गाने वापरल्याचे आरोप…… 

जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड कामाचे इस्टिमेट ग्रामपंचायतला प्राप्त झाले आहे सदरचे अंदाजपत्रक रु.४ लाख ९९ हजार ७०५ रुपये असून, ग्रामपंचायतीने त्यावर पाच लाख रुपयांपर्यंत खर्च केल्याची माहिती असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे. काम सुरू असताना त्याबाबत तक्रारी व हरकती घेतल्या आहेत. सदरचे काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्याबाबत संबंधित शाखा अभियंता यांनीही सरपंच यांना अनेक वेळा समज दिली. त्यामुळे ग्राम पंचायतीचा निधी गैरमार्गाने वापरला गेल्याचा आरोप आहे.

कब्रस्तान सुधारणा व संरक्षण भिंत बांधणे कामास प्रशासकीय मान्यता ३० लाख रुपये आहे. सदर कामात वीट बांधकाम प्लास्टर वॉटर फॅब्रिकेशन पाणी टाकी प्लंबिंग काँक्रीट रस्ता कामासाठी अनुदान प्राप्त झाले आहे.आदेशात नमूद असल्या प्रमाणे कामे झालीच नाहीत. आदेशात नमूद केल्याप्रमाणे कामे झाली नसून निधीचा गैरवापर झाल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.

         सर्व सभा तहकुब करण्यात आल्या…… 

सरपंच यांच्या कारकिर्दीत झालेल्या सर्व सभा तहकुब करण्यात आल्या. सभेची कार्यवृत्तांत सदस्यांनी मागणी करूनही घेण्यात येत नाहीत. त्यामुळे पंचायतीच्या कारभाराबाबत सदस्यांना काही कळू दिले जात नाही असे विविध आरोप सदस्यांनी केले आहेत. ग्रामपंचायतीने ठेवलेल्या नोंदवाह्या लेखी नियमाप्रमाणे ठेवल्या नाहीत. महिला व बालकल्याण निधी, अपंग निधी मागासवर्गीय निधी याबाबत बेपरवाहीने सदरचा निधी अखर्चित राहिला आहे असे विविध आरोप केले आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??