सामाजिक

तृतीयपंथीयांसाठी पोलीस ठाण्यात कक्ष ; कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींचे पोलिसांकडून निवारण करण्यात येणार ; रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस

पुणे : तृतीयपंथीयांच्या समस्या, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तृतीयपंथीय संरक्षण कक्ष (ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन सेल) सुरू करण्यात येणार आहे.

समाजकल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील विशेष कक्षांचे कामकाज सुरू राहणार आहे. तृतीयपंथीयांना संरक्षण देणे, तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

समाजकल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांत तृतीयपंथीय संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात याबाबतचे पत्र पोलीस आयुक्त कार्यालय आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते. पोलीस ठाण्यांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर पोलीस ठाण्यात तृतीयपंथीय संरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले. या कक्षाची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले.

समाजकल्याण विभागाकडे तृतीयपंथीयांकडून तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी कक्ष स्थापन करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाकडून देण्यात आल्या त्यानंतर पोलिसांकडून याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तृतीयपंथीयांना अनेकदा लिंग आधारित भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर या कक्षाच्या माध्यमातून त्यांना मदत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तृतीयपंथीयांच्या तक्रारींची दखल घेणे, तसेच त्यांना आवश्यक मदत करण्यासाठी पोलीस ठाण्यात संरक्षण कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींचे पोलिसांकडून निवारण करण्यात येणार आहे.

रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??