महाराष्ट्रसामाजिक

महाशिवरात्री निमित्त जेजूरीगडावर भाविकांची गर्दी, देव दर्शनासाठी मंदिर खुले ; जेजुरी..

पुणे (जेजुरी) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा (मल्हार) गडावरील त्रेलोकीचे शिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी पहाटेच्या सुमारास भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले.

पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून मोठ्या उत्साही वातावरणात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत सदानंदाचा जयघोष करीत तीनही लोकांचे दर्शन घेतले. भंडारा खोबऱ्याची उधळन, सदानंदाचा येळकोट, हर -हर महादेव च्या गजराने मल्हारगड दुमदुमून गेला होता.

जेजुरीच्या खडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवांमध्ये महाशिवरात्रीउत्सवाला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीचा प्रारंभ होताच मध्यरात्री १२ च्या सुमारास मुख्य मंदिराच्या कळसातील म्हणजेच स्वर्गलोकीचे शिवलिंग, तसेच मुख्य मंदिरामध्ये असलेले भूगर्भातील पाताळलोकीचे शिवलिंग आणि मंदिरामध्ये असलेले भूलोकीचे शिवलिंग खुले केले जाते. यातील मुख्यकळसातील शिवलिंग व भूगर्भातील शिवलिंग फक्त महाशिवरात्री दिवशीच खुली केली जातात वर्षभर ती बंद असतात.

सालाबाद प्रमाणे भाविक भक्तांसाठी श्री खंडोबा मंदिरात पहाटे महाशिवरात्री पूजेचे मानकरी (सोनवणे, वासकर, महाजन आदी) पुजारी सेवेकरी, विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांचे उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली व त्रिलोक दर्शन पहाटे तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आले असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे आदी विश्वस्त उपस्थित होते.भाविक भक्तांसाठी सकाळी पासूनच खिचडी प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.सदरील खिचडी प्रसाद हा भाविक भक्तांसाठी दिवसभर चालू राहणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??