क्राईम न्युजजिल्हा

२४ तासाच्या आत जेरबंद ५ आरोपींना अटक ; वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..

डॉ गजानन टिंगरे / पुणे

पुणे (इंदापूर) : (दि.२७) रोजी दुपारी १२/३० वा. सुमारास मौजे निरवांगी, ता. इंदापुर, जि. पुणे गावच्या हद्दीमध्ये इसम नामे उत्तम जालिंधर जाधव, वय ३४ वर्षे, रा. खौरोची ता. इंदापुर, जि. पुणे हे प्लसर दोन चाकी गाडीवरुन निरवांगी गावच्या हद्दीमधील वीर वस्तीच्या पलीकडे स्वतःच्या जे.सी.बी वरील ड्रायव्हरला जेवणाचा डबा देण्यासाठी निघालेला असताना इसम नामे राजु भाळे, नाना भाळे, तुकाराम खरात, निरंजन पवार, रामा भाळे, दादा आटोळे, शुभम आटोळे, स्वप्नील वाघमोडे व त्यांच्या सोबत असलेल्या इतर इसम यांनी चार चाकी व दोन चाकी गाडीमधुन येत उत्तम जाधव दोन चाकी गाडीला आडवी मारुन तुला लय मस्ती आलीय का, तु आमच्या दुश्मन असलेल्या लोकांना मदत करतो, आमच्या टिपा देतो, आमच्या भांडणात मध्यस्थी करतो असे म्हणत राजु माळे व त्याच्या सोबत असलेल्या साथिदार यांनी उत्तम जाधव यास लोखंडी कोयते, लोखंडी तलवारीने डोक्यावर, पाठीवर तसेच पायावर वार केले तसेच जवळ पडलेले दगड उचलुन अंगावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांना उपचारकामी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारकामी अकलुज येथे नेवुन अॅडमिट केल्याची माहिती मिळाली होती.

त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांना घटनेच्या अनुषंगाने मौजे निरवांगी ता. इंदापुर येथे घटनास्थळवरती भेट देवून नक्की काय प्रकार आहे याबाबत माहित घेवुन त्यांची सर्व माहिती ही मा. पोलीस अधिक्षक साो, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो, बारामती विभाग, मा.

उपविभागीय पोलीस अधिक्षक सो, बारामती उपविभाग व मा. पोलीस निरीक्षक साो, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांना दिली होती. त्यावेळी मा. पोलीस अधिक्षक साो, पुणे ग्रामीण, मा.

अपर पोलीस अधिक्षक साो, बारामती व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, बारामती उपविभाग यांनी तपासकामी दिलेल्या सुचनेप्रमाणे उत्तम जाधव यांना मारहाण करणारे सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळुन टिम तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना केल्या होत्या. यादरम्यान इसम नामे उत्तम जाधव याचेवर अश्विनी हॉस्पीटल, अकलुज याठिकाणी उपचार सुरू असताना तो उपचारा दरम्यान मयत झाला. त्यानंतर सदर घटनेच्या अनुषंगाने इसम नामे उत्तम भागवत याचा भाऊ नामे शामराव जालिंदर जाधव यांच्याकडे चौकशी करुन त्यांची लेखी फिर्याद घेवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.

रजि. नंबर ७५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ६१(२), १२६(२), १८९(२), १८९ (४), १९१(२), १९१(३),१९० सह शस्त्र अधिनियम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हादाखल केला आहे. सदर गुन्ह सदर गुन्हयाचा तपास करत असताना सदर आरोपी राजु भाळे व त्याच्या सोबतचे इतर ०३ आरोपी हे भिगवन राशीन रोडवर असुन ते हैद्राबाद याठिकाणी पळून जाण्याची तयारी करत असलेबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी तपास पथकाच्या टिम पाठवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर गुन्हयातील आरोपी नामे राजेंद्र ऊर्फ राजु भाळे, नाना भाळे, रामा ऊर्फ रामदास भाळे, शुभम ऊर्फ दादा आटोळे, स्वप्नील ऊर्फ बालाजी वाघमोडे हे सदर ठिकाणी मिळुन आले. त्यावेळी सदर आरोपींना तपास पथकाच्या टिमने पाठलाग करुन शिफातीने पकडुन त्यांना पुढील कारवाईसाठी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणले असुन सदर गुन्हयाचा तपास हा श्री.

राजकुमार डुणगे, सहा. पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करत आहे.सदर गुन्हयातील मयत इसम व त्याचे इतर साथिदार व सदर अटक आरोपी हे एकाच गावामध्ये राहणारे असुन त्यांच्यामध्ये गेले अनेक वर्षापासुन गावातील वर्चस्वाची लढाई सुरू असुन याच कारणांमुळे त्यांच्यामध्ये वेळोवेळी वाद होवु गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिनांक २५/०२/२०५ रोजी पप्पु हेगडकर हा वाळु मामाची मेंढरे चारणेसाठी गेलेला असताना इसम नामे अंकित कांबळे याने त्यास दमदाटी केली होती. त्या कारणांवरुन काल दिनांक २७/०२/२०२५ रोजी आरोपी व संकेत हेगडकर यांच्यामध्ये खोरोची ता.

इंदापुर येथे झालेल्या वादातुन आरोपी राजु भाळे व त्याचे इतर साथिदार यांनी मिळुन संकेत हेगडकर यांच्यावर गोळीबार केला होता त्याअनुषंगाने इंदापुर पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नंबर १६६/२०२५ बी. एन. एस १०९,११५ (२), ३५१,३५१(२),३(५), ऑर्म अॅक्ट ३(२५) प्रमाणे तसेच दिनांक २५/०२/२०२५ रोजीच्या घटनेच्या अनुषंगाने गु.

रजिनंबर १६७/२०२५ बी.एन.एस ११८ (१), ११५ (२) वगैरे प्रमाणे दोन गुन्हा दाखल आहेत. तसेच आरापी नामे राजेंद्र ऊर्फ राजु भाळे तसेच त्याचे इतर साथिदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे, सातारा, सोलापुर, अहिल्यानगर या जिल्हांमधील पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी मा. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा विभाग, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदिप संकपाळ तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक मिलींद मिठापल्ली, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोहवा गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, जगदीश चौधर, गणेश काटकर, दादासाहेब डोईफोडे, दत्तात्र्य चांदणे, महेश पवार, विकास निर्मळ, अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोफौ बाळासाहेब कारंडे, पोहवा अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल ढेरे यांनी पार पाडली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??