जिल्हाराजकीय

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची स्वारगेट बसस्थानकाला भेट, अंमलबजावणी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा,

पुणे : परिवहन व नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे स्वारगेट येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी आढावा बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.

श्रीमती माधुरी मिसाळ म्हणाल्या, भविष्यात अशा गंभीर घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दक्षता वाढवण्यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती तसेच जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

महिलांना निर्भयपणे प्रवास करता यावा, त्यांना सुरक्षिततेची हमी मिळावी व सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक लाभ घेता घ्यावा, यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे असेही श्रीमती माधुऊ मिसाळ म्हणाल्या.

या आढावा बैठकीस राज्य परिवहन नियंत्रण समितीचे प्रादेशिक व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळाचे व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??