सामाजिक

महिला सक्षमीकरण, महिला पोलिसांमुळे महिलांच्या सुरक्षेत व न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत मदत ; पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे…

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने लोणी काळभोर परिसरात बाईक रॅली...

पुणे (हवेली) : महिला सक्षमीकरण हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महिला पोलिसांमुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या पातळीत वाढ होते आणि त्यांना न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतही मदत होते. त्यामुळे महिला पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन राजेंद्र पन्हाळे यांनी केले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, वैजिनाथ शेलार, प्रशांत कळसकर व महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या समोर फुलांची रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. त्यानंतर महिला पोलिसांच्या बाईक रॅलीची लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली. पुढे बाईक रॅली दत्त मंदिर चौक, खोकलाई माता चौक, शिवाजी महाराज स्मारक, रामदरा रोड, पाषाणकर रोड, घोरपडी वस्ती, इंदिरानगर, सोलापूर महामार्ग, लोणी स्टेशन, एमआयटी कॉलेज, लोणी फाटा ते पुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाणे या मार्गाने काढण्यात आली. बाईक रॅलीच्या वेळी महिला पोलिसांनी ‘मुलगी शिकली, प्रगती झाली, बेटी बचाओ बेटी पढाओ’ या घोषणा दिल्या.

या रॅलीमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस हवालदार राणी खामकर, निशा कोंढे, अश्विनी माळी, वैशाली निखंबे, दिपाली पाटोळे, ज्योती नवले, अश्विनी पवार, कोमल आखाडे, लक्ष्मीबाई यादव, वनिता यादव, चंदा माने, शिल्पा हरिहर, योगिता भुसारे, सरिता जाधव, नीलम धांडे, उषा थोरात आदी महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??