क्राईम न्युज

९ जण ठार ; उभ्या असलेल्या एसटीवर प्रवासी जीप आदळून अपघात..; नारायणगाव…

पुणे (नारायणगाव) : पुणे नाशिक महामार्गवर मुक्ताई धाब्याजवळ आळेफाटाकडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची पुढे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एसटी बसवर आदळून भीषण अपघात होऊन यात ९ जण ठार झाले. तर इतर ६ जणांवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

        हा अपघात शुक्रवारी (दि. १७) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहचले. तसेच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व भाजपा तालुका अध्यक्ष संतोश खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

       याबाबत समजले माहिती अशी की, मुक्ताई धाब्याजवळ एसटी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी होती. या एसटीवर प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो प्रवासी वाहतूक गाडी जोरात आदळली. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला मागून येणाऱ्या आयषर टेम्पोने जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान आयशर टेम्पो चालकाने टेम्पो नारायणगाव पोलीस स्टेशनचसमोर सोडून दिला व तो पसार झाला.

        अपघातात एकूण सात जण जागेवर ठार झाले, तर दोघेजण उपचारादरम्यान ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतामध्ये एक दोन वर्षाचे बालक देखील असल्याचे समजते. तसेच एकूण मृतांपैकी सहा जण खेड तालुक्यातील असल्याचे समजते. तसेच उर्वरित मयत हे पिंपळवंडी वडगाव कांदळी आणि नारायणगाव परिसरातील असल्याचे समजते. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

                               मृतांची नावे खालील प्रमाणे. 

१) देबुबाई दामू टाकळकर वय ६५ वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे

२) विनोद केरूभाऊ रोकडे ५० वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे

३) युवराज महादेव वाव्हळ वय २३ वर्ष रा १४ नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे

४) चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय ५७ वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे

५) गीता बाबुराव गवारे वय ४५ वर्षे १४ नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे

६) भाऊ रभाजी बडे वय ६५ वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे

७) नजमा अहमद हनीफ शेख वय- ३५ वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर

८) वशिफा वशिम इनामदार वय ५ वर्ष

९) मनीषा नानासाहेब पाचरणे वय ५६ वर्षे रा.१४ नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??