सामाजिक

अधिनियमात गुरव व पुजारी यांना ‘हितसंबंधी व्यक्ती’ अंतर्भूत करण्यासाठी दुरुस्ती विधेयक विधानसभेमध्ये सादर ; देवस्थानच्या जमीनी ठरतायत…

पुणे : देवस्थानच्या जमीनी ठरतायत वादाचा विषय असे म्हणायला काही हरकत नसायचा पाहिजे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियमात गुरव व पुजारी यांना ‘हितसंबंधी व्यक्ती’ अंतर्भूत करण्यासाठी दुरुस्ती विधेयक विधानसभेमध्ये सादर करण्यात आले आहे.

राज्यात मोठ्या संख्येने मंदिरे असून, त्यातील अनेकांचा कारभार धर्मादाय आयुक्तांच्या आधिपत्याखाली विश्‍वस्त मंडळ पाहत असते.

अशा देवस्थानांच्या व्यवस्थेसाठी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जमिनी देवाच्या नावे मालकी हक्काने केल्या होत्या. तेथील पुजारी, गुरव अथवा मंदिरामध्ये सेवा देणाऱ्यांना त्या देवतेची दररोज पूजा व मंदिराची स्वच्छता करण्याची सेवा द्यावी, यासाठी या जमिनींची वहिवाट करण्याचे अधिकार दिले होते. त्यामागची धारणा अशी होती, की वहिवाटदाराने जमिनी कसून त्याचे उत्पन्न घ्यावे व त्या देवाची विहित सेवा करावी.

१९५० मध्ये ट्रस्ट नोंदणीचा कायदा आल्यावर या सार्वजनिक देवस्थानांची नोंदणी करण्यात येऊन या जमिनी अशा देवस्थान ट्रस्टच्या मिळकती म्हणून नोंद करण्यात आली. साधारणतः वतन कायद्यानुसार महसूलमध्ये जमिनी ‘इनाम वर्ग ३ – देवस्थान इनाम’ म्हणून नोंद होते. या जमिनींची विक्री धर्मादाय आयुक्तांच्या पूर्व परवानगीने व राज्य सरकारकडून ‘इनाम वर्ग ३’चा शेरा रद्द केल्यावर होऊ शकते. अशा देवस्थानांच्या नोंदणी करताना, त्याची नियमावली तयार करताना गुरव, पुजारी अशा सेवाधाऱ्यांना हितसंबंधी व्यक्ती म्हणून मान्यता देऊन त्याचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी ट्रस्ट कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे दुरुस्ती विधायक विधिमंडळामध्ये चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे.

ॲड. शिवराज कदम-जहागीरदार, माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

”नजीकच्या काळात वाढत्या किमतींमुळे देवस्थानांच्या जमिनींची मालकी हा अत्यंत संवेदनशील विषय झालेला आहे. विश्‍वस्त व वहिवाटदार यांच्यामध्ये जमीन विक्री हे अनेकदा वादाचे कारण ठरते. त्यामुळे कायद्यात योग्य तरतूद झाल्यास अशा प्रकरणी न्याय निर्णय करण्यास अधिकाऱ्यांना संविधानिक आधार मिळेल.’

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??