क्राईम न्युज

अनैतिक संबंधातून नवऱ्याला संपवलं, पतीचा मृतदेह पोत्यात घालून ५५ किलोमीटर दूर नेला अन् विल्लेवाट, सविस्तर बातमी वाचा…

पुणे (हडपसर) : पुण्यात चालय तरी काय पुण्यात अनैतिक संबंधातून पतीची पत्नीकडून आणि प्रियकराकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हत्यानंतर पतीचा मृतदेह पोत्यात घालून ५५ किलोमीटर दूर नेला अन् विल्लेवाट लावल्याचं देखील समोर आलंय. नेमकं काय काय झालं?

विवाहबाह्य संबंध

हडपसर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिचा प्रियकर दररोज तिला लपूनछपून भेटायला येत असायचा. पण नवऱ्याचा याची काहीही खरब लागायची नाही. एक दिवस रात्री नवरा बायको झोपलेले असताना प्रियकर अचानक भेटण्यासाठी घरी आला. बायकोने प्रियकराला निघून जाण्यास सांगितलं.

नवऱ्याला कून कून लागली अन्…

पण तेवढ्याच नवऱ्याला कून कून लागली. नवऱ्याने उठून पाहिल्यावर त्याला पत्नी आणि तिचा प्रियकर दिसला. यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली. याच भांडणात पत्नीने आणि प्रियकराने नवऱ्याची हत्या केली. भांडणात नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं पत्नीच्या लक्षात आलं अन् डोक्याला हात लावला.

मृतदेहाची विल्हेवाट

बायको आणि तिच्या प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रात्री दीड वाजता स्कुटरवरून मृतदेह हडपसरपासून सारोळ्याला नेला. ५५ किलोमीटर दूर असलेल्या नदीत मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण पोलिसांना या हत्येचा सुगावा लागला अन् आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

आरोपींना बेड्या

दरम्यान, सिद्धेश्वर बंडू भिसे असे मृत पतीचे नाव आहे. तर आरोपी योगिता सिद्धेश्वर भिसे आणि शिवाजी सुतार यांना राजगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??