क्राईम न्युज

लोणी काळभोर पोलीसांची अवैध मटका-जुगार अड्ड्यावर धडक कारवाई ; २ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, ७ जणांना अटक…

लोणी काळभोर (ता. हवेली) : परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार व्यवसायाविरुद्ध लोणी काळभोर पोलीसांनी मोठी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण सुमारे २ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना थेकर फाटा परिसरात नयन बारजवळ अवैधरित्या ‘कल्याण मटका’ व ‘सोरट पत्ती’ जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने नियोजनपूर्वक सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी काही जण जुगार खेळताना तसेच जुगार चालवताना रंगेहात पकडले गेले.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुजित हरी बोडके (रा. थेकर), करण सुरेश कारे (रा. कदमवाक वस्ती), विशाल गुंडाप्पा वाघमारे (रा. माळी मळा, लोणी काळभोर), सतिष दिलीप चौडकर (रा. कुंजीरवाडी), बंटी शंकर गायकवाड (रा. तरवडे रायवाडी), मंदार सोपान हगवणे (रा. सोरतापवाडी) आणि शिवाजी बारकू चव्हाण (रा. थेऊर) यांचा समावेश आहे.

पोलीसांनी छाप्यात ९,३०० रुपये रोख रक्कम, सुमारे १० हजार रुपयांचे मोबाईल हँडसेट, तसेच अंदाजे १ लाख ९० हजार रुपयांच्या मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार विकास राजूभाऊ कांबळे (रा. कारेवाडी) हा सध्या फरार असून त्याच्यासह इतर दोन अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार संदीप जोगदंड, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, प्रविण दडस, अशोक गिरी तसेच महिला पोलीस अंमलदार माधुरी खोमणे यांनी सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जाणार आहेत. “अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरकृत्यांची माहिती पोलीसांना द्यावी,” असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

या कारवाईमुळे परिसरातील अवैध मटका-जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला असून स्थानिक नागरिकांनी पोलीसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??