जिल्हासामाजिक

अवैध व्यावसायिकांच्या नाडया आवळणार ” व्हॉट्सअप दक्ष प्रणाली ” पुणे ग्रामीण पोलीसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…व्हिडिओ पहा…

पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयातील सुजाण, जागरूक नागरीकांकडून पोलीस खात्यास नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्यामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न असेल किंवा सामाजिक, राजकीय, धार्मिक मुद्यांतर्गत तणाव असेल अशा वेळी नागरीकांकडून पोलीस खात्यास योग्य सहकार्य केले जाते.

समाजातील नागरीकांना आपला दिनक्रम तसेच जीवन शांततेत, सुव्यवस्थेत व्यतित करण्यास मिळावे या दृष्टीकोनातून पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” हा नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

सध्याचे कालावधीत मोबाईल हा मनुष्याचे जीवनातील एक अविभाज्य घटक झालेला असून याच मोबाईल मधील सोशल मिडीयाचा वापर करून नागरीकांना आपली तक्रार करणे सुलभ होणार आहे. बऱ्याच सुजाण, जागरूक नागरीकांना आजुबाजूला अगर परिसरात असणारे अवैध धंद्यांविषयी तक्रार करावयाची असते, परंतु प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जावून तक्रार देण्यासाठी त्यांना शक्य होत नाही अगर भिती वाटत असते. त्यामुळे नागरीकांनी पोलीस स्टेशनला न जाता, आहे त्या ठिकाणाहून मोबाईल मधील ” व्हॉट्स अॅप ” या सोशल मिडीया अॅपचा वापर करून अवैध धंदे व्यवसाय विषयीची तक्रार/माहिती पुणे ग्रामीण पोलीसांना देणे सोयीचे व सुलभ व्हावे याकरीता पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे संकल्पनेतून ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” उपक्रमांतर्गत 9922892100 असा व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर पुरविण्यात येत आहे.

नागरीकांनी 9922892100 हा मोबाईल नंबर आपले मोबाईल मध्ये सेव्ह करून या मोबाईल नंबरचे व्हॉट्स अॅप वर सुरूवातीस Hi असा शब्द/मेसेज पाठवून चॅटींग सूरू करावे. सदर मोबाईल नंबरवरील व्हॉट्स अॅप हे स्वयंचलित असल्याने त्यावरून आपणास प्रतिसाद मिळेल व पुढील पर्याय सुचविण्यात येतील. सदरची प्रणाली ही मराठी मध्ये असून अगदी सोप्या पद्धतीने तिचा वापर करता येणार आहे. या प्रणाली द्वारे नागरीकांना आपले परिसरातील अवैध धंदे / अवैध व्यवसायाविषयीच्या तक्रारी पोलीसांना देताना त्यामध्ये अवैध व्यवसाय असलेल्या ठिकाणाचे नाव, अवैध व्यवसाय करणाराचे नाव, फोटो, लोकेशन अशी माहिती देता येणार आहे. सदरचे ठिकाणाबाबत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस उपविभागाचे नाव नोंदविणे आवश्यक राहणार आहे. ही सर्व प्रक्रीया प्रणालीद्वारे स्वयंचलित असून तक्रारदार यांचा मोबाईल नंबर तसेच त्यांचे नाव हे पुर्णतः गोपनीय राहणार आहे.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” उपक्रमांतर्गत 9922892100 हा व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर नागरीकांसाठी प्रसारीत करून या प्रणालीचा शुभारंभ करणेत आला आहे. या प्रसंगी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक पुणे व बारामती विभाग तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरीकांनी आपापले तसेच आजूबाजूचे परिसरातील अवैध धंदे / अवैध व्यवसायांची माहिती ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” उपक्रमांतर्गत पुरविणेत आलेल्या 9922892100 या व्हॉट्सअॅप मोबाईल नंबरवर द्यावी, जेणेकरून अवैध धंद्यांचे / अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करणेकरीता पुणे ग्रामीण पोलीसांना सहकार्य होईल, असे आवाहन पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??