जिल्हासामाजिक

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत…

६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त...

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात महसूली उत्पन्न, गुन्हे अन्वेषण तसेच अनुज्ञप्त्यांवर कारवाईच्या बाबतीत गतवर्षीपेक्षा भरीव कामगिरी केली आहे. या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षात २ हजार ९९८ कोटी ३३ लाख रुपये इतका महसूल जमा झाला आहे. सन २०२३-२४ च्या २ हजार ७२९ कोटी ४४ लाख रुपयांच्या तुलनेत महसुलात ९.८५ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ५ हजार ९९५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५ हजार ८९१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे २९९ बंधपत्र घेण्यात आले असून रक्कम २ कोटी १८ लाख रुपये रकमेची बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. एमपीडीए कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या एकूण ९ प्रस्तावांपैकी १ प्रकरणात सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनुज्ञप्तीचे वारंवार सखोल तपासणी करुन नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई येत आहे. सन २०२४-२५ वर्षात एकूण ५६९ अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ४ अनुज्ञप्ती कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. या विभागीय विसंगती प्रकरणात १ कोटी ८६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार धाब्यावर अवैध मद्य विक्री करणाऱ्याविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध एकूण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये १ हजार २५० आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण ८ लाख १९ हजार रुपये द्रव्य दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई न करता त्यासोबत या ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांनादेखील चाप बसणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच परराज्यातील मद्य, अवैध ढाबे, अवैध ताडी, विक्री विरुद्ध २१ पथकांमार्फत कठोर करण्यात येत आहे. नागरिकांना मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??