जिल्हा

महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे व हरियाणाचा पै. शाॅन्टीकुमार यांची शेवटची रोमहर्षक, चितपट कुस्ती ; लोणी काळभोर…

लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा संपन्न...

पुणे : लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा संपन्न झाली. दुपारनंतर झालेल्या या आखाड्यात महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे व हरियाणाचा पै. शाॅन्टीकुमार यांची शेवटची रोमहर्षक, चितपट कुस्ती त्या बरोबरच आखाड्यात अनेक महाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार विजेते, उपमहाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा पैलवान उपस्थित होते.

संयोजकांनी केलेले आखाड्याचे सुरेख नियोजन, ६१ चितपट कुस्त्यांना तब्बल ३० लाख रुपयांची रोख बक्षिसे, प्रेक्षकांना व्यवस्थित कुस्त्या पहाता याव्या म्हणून केलेली बैठक व्यवस्था व डिजिटल स्क्रीनची सोय तसेच हजारो कुस्तीप्रेमी प्रेक्षकांची उपस्थिती त्यामुळे रात्री साडे दहापर्यंत चाललेला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा हे यावर्षीच्या लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

सन २००१ सालचे महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर व त्यांचे सहकारी, काळभैरवनाथ अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, स्थानिक गावकरी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रेक्षकांना चांगल्या कुस्त्या बघण्याचा आनंद मिळाला. संयोजकांनी केलेले चोख, सुंदर नियोजन, त्याला गावकर्‍यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आखाडा अतिशय सुरेख व देखणा झाला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मल्लांनी व कुस्ती शौकीनांनीही आखाड्याच्या चांगल्या नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.

दुपारी गावकरी वाजत गाजत मिरवणुकीने आखाड्यात आल्यानंतर कुस्ती आखाड्याला सुरुवात झाली. सुरुवातीला छोट्या छोट्या कुस्त्या लावण्यात आल्या. त्या नंतर निकाली ६१ कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली.

सर्वात मोठी व शेवटची २ लाख २१ हजार इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे व हरियाणाचा पै योगेश पवार यांच्या कुस्तीत शिवराज राक्षेने विजय मिळवला.

दुसरी २ लाख रुपयांची आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा मल्ल, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने हरियाणा केसरी विशाल भोंदू याला अस्मान दाखवले.

दिड लाख रुपयांची तिसऱ्या क्रमांकावरील कुस्तीमध्ये कर्जत (जामखेड) येथील स्पर्धेचा विजेता, महाराष्ट्र केसरी वेताळ दादा शेळके याने इराणचा अली इराणी याचा पराभव करून जिंकली.

कुस्त्यांच्या या जंगी आखाड्यात निकाली कुस्त्यांसाठी उपस्थित प्रेक्षकांचे व गावचे मिळून एकूण सुमारे रोख ३० लाख रुपये विजेत्या मल्लांना बक्षिस म्हणून देण्यात आले. प्रेक्षकांना कुस्ती व्यवस्थित दिसावी म्हणून डिजिटल स्क्रीनची सोय करण्यात आली होती. त्यामुळे निवांत बसून प्रेक्षकांनी कुस्त्यांचा आनंद घेतला. तसेच यूट्युबवरही या आखाडय़ाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी घरी बसूनही ऑनलाईन कुस्ती पाहण्याचा आनंद लुटला.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??