जिल्हासामाजिक

डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचा धक्कादायक प्रकार… वाचा सविस्तर…

डांबर खरेदी प्रकरणाची कसुन चौकशी करण्याचे आदेश, त्याचा अहवाल पुढील काही दिवसांत सादर होईल, घोटाळेबाज ठेकेदार यांच्या वर कारवाई होणार... महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले...

                                          (फोटो सोशल मीडिया)

पुणे : डांबर खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराकडून डांबराची खरेदी करण्याची निविदा रद्द करून आता कंपन्यांकडून डांबराची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती पुढील प्रमाणे दिली.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याचा अहवाल पुढील काही दिवसांत सादर होईल, असे भोसले यांनी सांगितले. डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी महापालिका ठेकेदारामार्फत डांबराची खरेदी करीत होती. त्यामुळे महापालिकेचे प्रतिटन चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत होते. महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप माजी सभागृह नेते नीलेश निकम यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

याबाबतची काही कागदपत्रे निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त भोसले यांना महापालिका ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करीत असल्याबाबत विचारले असता ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आली आहे. यापुढील काळात थेट कंपनीकडून डांबराची खरेदी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यावरून निकम यांनी महापालिकेत डांबर घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. महापालिका काही वर्षांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट डांबराची खरेदी करत होती. मात्र, तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी थेट खरेदी बंद करत निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदारामार्फत ही खरेदी सुरू केली होती. एकाच ठेकेदाराला हे काम मिळत असल्याने यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले जात होते.

डांबर खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाची चौकशी केली जात असून, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे. तसेच यापूर्वीच्या ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.

तत्कालीन आयुक्तांनी ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही खरेदी केली जात असल्याचे पथ विभागाचे प्रमुख पावस्कर यांनी सांगितले. कंपनीकडून डांबराची थेट खरेदी केल्यानंतर वाहतुकीचा खर्च महापालिकेला करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डांबर खरेदीबाबत झालेल्या आरोपांची चौकशी केली जात असून, त्याचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एक टन डांबर आणि वाहतूक यावर सर्वसाधारण साडेसात हजार रुपये खर्च होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

घोटाळेबाज ठेकेदार यांच्या वर कारवाई होणार का? घोटाळेबाज  ठेकेदार यांची कामाची तपासणी संबंधित खात्याकडून होणार का?.. 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??