क्राईम न्युज

डोके दुखत असलेल्या मेहुणीला गुंगीच्या गोळ्या खाण्यास देऊन तिच्यावर जबदरदस्तीने बलात्कार ; वारजे माळवाडी…

पुणे : उत्सवासाठी घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून दाजीने विवाहित मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. डोके दुखत असलेल्या मेहुणीला गुंगीच्या गोळ्या खाण्यास देऊन तिच्यावर जबदरदस्तीने बलात्कार केला आहे.

या प्रकरणी १८ वर्षांच्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून ३६ वर्षीय दाजीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या घरातील लोक दि. ३ ते १२ ऑक्टोबर २०२४ कालावधीत नवरात्रीनिमित्त यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी तिचा दाजी घरी होता. तरुणीचे डोके दुखत असल्याचे दाजीला सांगितले होते. त्यावेळी दाजीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून मेहुणीला दोन गोळ्या खायला दिल्यामुळे तिला गुंगी आली. त्याचदिवशी संधीचा फायदा घेऊन आरोपीने मेहुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला.

तू आपल्यामध्ये झालेल्या शारीरिक संबंधाबद्दल कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. शारीरिक संबंधाचे चित्रीकरण तरुणीच्या सासरी व पतीला दाखवून तिच्या पतीला शिवीगाळ करत भांडणे केली.

                तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी…

तरुणीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी तरुणाने दबाव टाकला. ‘माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझे लग्न होऊ देणार नाही,’ अशी धमकी देणाऱ्या तरुणावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे २०२४ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. आरोपीने तरुणीला लग्न न केल्यास तिचे फोटो इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ‘तुझ्या घरी येऊन विष पिऊन जीव देईन, नाहीतर करंट लावून घेतो,’ असेही त्याने धमकाविल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??