राजकीय

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा..

डॉ गजानन टिंगरे

पुणे : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने २२ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी- पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेतली.

       यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी योगेश फडतरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव आदी उपस्थित होते.

        मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात शेतीशी निगडित नवीन तंत्रज्ञान, उद्योग तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम याचे स्टॉल यावेत. त्यादृष्टीने कृषी विभागाने पंचायत समितीला सहकार्य करावे. इंदापूर तालुका हा शेतीतील प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांना लाभ होऊन जीवनात परिवर्तन होऊ शकते, असेही ते म्हणाले.

         ते पुढे म्हणाले, या प्रदर्शनात शासकीय अनुदान असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. रोपवाटिकांमध्ये येणाऱ्या नवीन वाणांचाही समावेश स्टॉलमध्ये करण्यात यावा. नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांना आमंत्रित करावे. पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागालाही सहभागी करुन घ्यावे, असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.

        यावेळी जगदाळे यांनी या प्रदर्शनाच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्हा बँकेच्यावतीने नवीन तंत्रज्ञानासाठी असलेल्या कर्जवाटपाच्या योजनांच्या माहितीचा तसेच डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा आदींबाबत स्टॉल लावावा, अशा सूचना त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

         गवसाने तसेच काचोळे यांनीही या प्रदर्शनाच्या दृष्टीने कृषी संबंधित नवीन तंत्रज्ञान असलेल्या संस्था, उद्योग, कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे स्टॉल लागतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://vedhjanshakticha.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??