राजकीय

हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ठरणार ; पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र…

पुणे : २०२५ ते मार्च २०३० मार्च या पंचवार्षिक कालावधीसाठी हवेली तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण ठरवण्यासाठी शुक्रवार (२३ एप्रिल) रोजी दुपारी १२ वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आरक्षणाची सोडत होणार आहे.

हवेली तालुक्यातील एकुण ७१ पैकी ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत यावेळी काढण्यात येणार आहे. या ७१ गावांची एकूण लोकसंख्या २ लाख ६२ हजार ३३८ असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ३४ हजार ७५२ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५ हजार ९१७ आहे. अनुसूचित जातीसाठी १० सरपंचपदे राखीव असून त्यातील ५ जागी पुरुष तर ५ जागी महिला सरपंच होणार आहेत अनुसूचित जमातीसाठी २ सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यापैकी १ जागी पुरुष तर एका जागी महिला सरपंच होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी १९ सरपंच पदे राखीव असून त्यापैकी ९ जागी पुरुष तर १० जागी महिला सरपंच होणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० सरपंच पदे असून त्यापैकी २० जागी पुरुष तर २० जागी महिला सरपंच होणार आहेत.

यावेळी खालील प्रमाणे गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार…

लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, कोरेगाव मुळ, वडकी, लोणीकंद, कोलवडी साष्टे, आव्हाळवाडी, केसनंद, वाडेबोल्हाई, हिंगणगाव, प्रयागधाम, वळती, शिरसवडी, बिवरी, सांगवी सांडस, भवरापुर, पिंपरी सांडस, शिंदेवाडी, खामगावटेक, टिळेकरवाडी, नायगाव व पेरणे
खानापूर, गोगलवाडी, अहिरे, खामगांव मावळ, मालखेड, गो-हे बु., शिवापूर, मणेरवाडी, श्रीरामनगर, मांडवी बु., कुडजे, कोंढणपुर, खेडशिवापूर, गाउडदरा, आर्वी, आंबी, जांभळी, गो-हे खुर्द, डोणजे, सोनापुर, मांजरी खुर्द, बहुली, मांडवी खुर्द, घेरासिंहगड, वरदाडे, सांगरुण, रहाटवडे, खडकवाडी, , अष्टापुर, वढु खुर्द, शिंदवणे, बकोरी, पेठ, डोंगरगाव, तुळापुर, भावडी, न्हावी सांडस, तरडे, बुर्केगाव, या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.

यावेळी खालील प्रमाणे गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार नाही…

आगळंबे, निरगुडी, वडगाव शिंदे, फुलगाव व कल्याण या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत या दिवशी होणार नाही

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??