सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साधना विद्यालयात वृक्षारोपण, वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे : प्राचार्य दत्तात्रय जाधव…

संपादक सुनिल थोरात

पुणे (हडपसर) : “मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे, आपल्या वसुंधरेला हरित व प्रदूषणमुक्त करून संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे”, असे मत विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले. ५ जून २०२५ रोजी साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज, हडपसर येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी व वसुंधरेचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. तसेच उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु. कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, पर्यवेक्षिका साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे, ज्युनियर कॉलेज प्रमुख डॉ.धनाजी सावंत, विजय सोनवणे, गजेंद्र शिंदे,
राष्ट्रीय हरित सेनेचे व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील शिक्षक कोंडीबा टेंगले, संदीप पिसे, सिद्धेश्वर काशिद, सुषमा कारंडे व राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??