जिल्हामहाराष्ट्र

बक्षिसे व पदके प्राप्त करावीत, अधिकारी, अंमलदारांच्या कामाचे बक्षीस, पदकांसाठी प्रस्ताव पाठवा ; विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांचे आवाहन…

सोलापूर : प्रत्येक पोलिस अधिकारी व अंमलदाराने आपले कर्तव्य प्रामाणिक व चोखपणे बजावून पोलिस खात्यास शोभनीय काम करावे. त्यांच्या कामाचे बक्षीस, पदकांचे प्रस्ताव स्थानिक वरीष्ठांनी वेळोवेळी सादर करावेत. येथील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक बक्षिसे व पदके प्राप्त करावीत. जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे मंगळवारी (ता. १७) सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर परेडची पाहणी करून सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांची वार्षिक तपासणी केली.

यावेळी झालेल्या दरबारात उत्कृष्ट कामगिरी करणारे पदक व पुरस्कार प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा त्यांनी सत्कार केला. सत्कार झालेल्यांमध्ये करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, भरोसा सेलमधील महिला पोलिस कर्मचारी सुरेखा शिंदे, अर्चना शिंदे, श्वान पथकातील टेरी व जिमी श्वानाचे प्रशिक्षक व हॅन्डलर पोलिस अंमलदार सिद्धलिंग स्वामी, चिदानंद रायकोटी, राजू इंगळे यांचा समावेश आहे.

तसेच मागील काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचा उत्कृष्ट व कुशलतेने तपास करणारे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नारायण पवार, बालाजी कुकडे, सहायक पोलिस निरीक्षक चौधरी व त्यांच्या पथकातील ३२ अंमलदारांचा देखील त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??