जिल्हासामाजिक

पालखी तळावर वारकऱ्यांच्या सुविधांचे नियोजन ; कदमवाकवस्ती ग्रामपंचायत… वाचा सविस्तर…

पुणे (हवेली) : (२२ जून) रोजी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे मुक्कामी येणार्‍या जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कदमवाकवस्ती व लोणी काळभोरचे ग्रामस्थ सज्ज झाले असून वारक-यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायती समवेत पोलीस प्रशासन, महसूल खाते, प्राथमिक आरोग्य केंद्र आपापल्या परीने सुसज्ज झाले आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे उपसरपंच नासिर पठाण व ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांची माहिती…

पुणे शहरातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून रविवार (२२जून) रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील नवीन पालखी तळावर मुक्कामी येणार आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे उपसरपंच नासिर पठाण व ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालखी तळावर निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणी कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत, आरोग्य सेवा, पोलीस, व्हिआयपी व हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. याचबरोबर एकाच वेळी सुमारे १५० जणांची अंघोळ होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की सोहळ्यांतील वारक-यांना पिण्यासाठी इंदिरा नगर, एंजल हायस्कूल, कवडी, कदमवस्ती व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणच्या आर. ओ. प्लॅन्ट मधून वारक-यांना पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येणार आहे. संबंधित दिंडी प्रमुख किंवा वारक-यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन उपसरपंच नासिर पठाण यांनी केले आहे.

सोहळा जरी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे हद्दीत असला तरी पुर्वीच्या परंपरेनुसार वारकरी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत जास्त प्रमाणात मुक्कामी असतात.

लोणी काळभोर सरपंच भरत काळभोर व ग्रामविकास अधिकारी वनवे यांची माहिती…

वारक-यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आठवडा बाजार मैदान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, गावठाण परिसर, गावातील प्रमुख रस्ते, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे मैदान, कन्या प्रशाला, मराठी शाळेचे मैदान व गावातील सर्व मंदिरे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली आहे. व सर्व ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारक-यांना पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी परिसरातील विहिरींमध्ये टीसीएल टाकून पाणी शुद्ध करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना मेडिक्लोरच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. डासांच्या निर्मूलनासाठी फाॅगिंग मशीनच्या माध्यमातून धूर फवारणी करण्यात येत आहे. अशी माहिती देण्यात आली.

लोणी काळभोर वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे, डॉ. डी. जे. जाधव यांची माहिती…

लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रही पालखी सोहळ्यातील वारक-यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे व डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. मांजरी फार्म, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पालखी तळ या ठिकाणी वारक-यांच्या मोफत उपचारासाठी तात्पुरती मदत केंद्र २४ तास चालू करण्यात येणार आहेत. ज्या ३० विहिरी व ३८ बोअरवेेल व हातपंपाबंमधून वारक-यांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाच्या एक कर्मचारी नेमण्यात आला आहे. व माहितीसाठी फ्लेक्स लावण्यांत आलेले आहेत. त्यामुळे फक्त शुद्ध केलेले पाणीच टॅन्कर मध्ये भरून देण्यात येईल. परिसरातील १०० हाॅटेलमधील पिण्याचे पाणी शुद्ध करण्यात आले आहे. व त्यांना स्वच्छतेेबाबत आवश्यक त्या सर्व सुचना करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य केंद्रातील ३ वैद्यकीय अधिकारी ४ आरोग्य सहाय्यक, ५ आरोग्य सेवक व ३० आशा स्वयंसेेविका या पथकाच्या माध्यमातून वारक-यांना उच्च दर्जाची तातडीची आंतररूग्ण व बाह्यरूग्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच १०२ च्या ७ व १०८ ची १ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??