क्राईम न्युजजिल्हा

कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्यांना अटक : कदमवाकवस्ती

पुणे (हवेली) : कोणी येथे थांबला तर आज जिवंत सोडणार नाही. आम्ही इथले भाई आहोत. अशी धमकी देत हवेत कोयता फिरवून दहशत माजवणा-यां दोन तरुणांना जेरबंद करण्यात आले आहे.

सदर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावरील गोल्ड सिटी जवळ गुरुवार (२६ जून) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अँड. ओंकार मच्छिद्र कामठे (वय ३०, रा. पांडवदंड फुरसुंगी ता हवेली जि पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून
सचिन किसन राठोड (वय २१), प्रतिक बाळासाहेब शिंदे (वय २२) व नैतीक बाळासाहेब शिंदे ( तिघेही रा. पठारे वस्ती लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी सचिन राठोड व प्रतिक शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार कामठे हे वकील असून ते कुटुंबासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहतात. ते गुरुवारी घरी असताना, त्यांना अचानक घरासमोर आरडओरडा सुरु असल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, सचिन राठोड, प्रतिक व नैतीक शिंदे हे तिघेजण मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते. तसेच हवेत कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. काही नागरिकांनी सचिन राठोड व प्रतिक शिंदे यांना पकडले. व दोघानाही चांगला चोप दिला. यावेळी नैतीक शिंदे हा दुचाकीवरून पळून जाण्यास यशस्वी झाला.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. व गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??