जिल्हासामाजिक

“प्रत्येक झाडात दिसो आईचं प्रेम : ‘एक पेड माँ के नाम’ अनोखी संकल्पना!”

एक पेड माँ के नाम' ; पर्यावरण व आई दोघांचा सन्मान!"

पुणे हवेली : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे एक वृक्ष, प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष, प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही. असे प्रतिपादन प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले.

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘हरितसेना संलग्न निसर्ग साधना मंडळातील’ शालेय विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ महावृक्ष लागवड अभियानाला महाराष्ट्र राज्य ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, शिवभक्त मुरलीधर गुजर यांच्या हस्ते झाली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव (प्रशासन )व या विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदरची मोहीम सुरू झाली असून नैसर्गिक संसाधने आणि त्यांचा वापर, त्याचबरोबर झालेली वृक्षतोड व त्यांच्या दुष्परिणाम या सर्व बाबींचा विचार करून सदर मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना संलग्न निसर्ग साधना मंडळाचे सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेश चौरे, सुरेश कोरे, सातगोंडा कांबळे व सर्व शिक्षकवृंद यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी लोणी गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढून ‘झाडे लावा झाडे जगवा’ व ‘एक पेड माँ के नाम’ अश्या घोषणा देत वृक्षदिंडी काढली व नागरीकांना झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला.

याप्रसंगी विद्यालयात शिसम, आपटा, करंज, बकुळ व जास्वंद, सदाफुली, मोगरा, गुलाब अशा झाडांचे वृक्षारोपण केले. तसेच तिर्थक्षेत्र रामदरा माळरानावर पहिल्या टप्प्यात २५० महावृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा व संवर्धन करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर यांनी केले. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे विद्यालयाच्या हरितसेनेच्या प्रमुख शिक्षिका शर्मिला साळुंखे यांनी आभार मानले.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??