जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ : हवेली तालुक्यात EVM FLC प्रक्रिया यशस्वी…

हवेली (पुणे) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) मशीनच्या FLC (First Level Checking) प्रक्रियेचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. EVM तपासणीची जबाबदारी तहसीलदार तृप्ती कोलते व तहसीलदार अर्चना निकम यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली. तर EVM कक्ष अधिकारी सचिन आखाडे, किशोर पाटील आणि गजानन किरवले यांनी या प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करत प्रभावी अंमलबजावणी केली.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सर्व EVM मशीनची FLC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये कंट्रोल युनिट (CU) ची एकूण ४२५ युनिट्स तर बॅलेट युनिट (BU) ची १०१३ युनिट्स तपासण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह राहावी यासाठी FLC ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, तांत्रिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रत्येक मशीनची सखोल तपासणी करण्यात आली. FLC प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या मशीन पुढील वापरासाठी वगळण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार तसेच EVM कक्ष अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया वेळेत, शांततेत आणि सुरळीतरीत्या पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आगामी निवडणुका निर्भय आणि विश्वासाच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??