कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

शासनाच्या फसवणूकीबद्दल शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द…

पुणे : शहरातील मार्केट यार्ड भागात शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा परवाना सुरू होता. सदर परवाना श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे नावाची व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय चालवत असल्याचे परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांनी तपासणी केल्यावर आढळून आले. तसेच तपासणी दरम्यान श्री. हाडे यांना सदर रास्त भाव दुकानात अनेक गंभीर दोष आढळून आले जसे की रास्त भाव दुकान शासन निर्धारित वेळेत बंद ठेवणे, महिला मंडळाचे दुकान इतर व्यक्तीने चालवणे, रास्त भाव दुकानात शासनाने नेमून दिलेले दप्तर न ठेवणे, रास्त भाव दुकानातील तराजू व वजने प्रमाणित नसणे, शिधापत्रिकाधारकांशी अरेराविपणे बोलणे व धमकावणे तसेच तपासणी वेळी प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात तफावत आढळून येणे असे दोष आढळल्याने प्रशांत खताळ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकान परवाना क्रमांक ह 31 कायमस्वरूपी रद्द केला.

तसेच शारदा महिला मंडळ सद्यस्थितीत अस्तित्वात आहे का याची खातर जमा करण्यात येत आहे. दुकानातील आढळून आलेल्या दोषांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडाची रक्कम रु 33 हजार 666 वसूल करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच सर्व परिमंडळ कार्यालयातील सहकारी संस्था व महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही खताळ यांनी दिल्या आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??