जिल्हासामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी निषेध मोर्चा पुढे ढकलला ; लवकरच नव्या नियोजनाची घोषणा सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव…

पुणे (हवेली) : (दि.२८ जुलै २०२५) यवत (ता. दौंड) येथील नीलकंठेश्वर मदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच देणारी घटना आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ सोमवार, दि. २८ जुलै रोजी एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव मोर्चा तत्पुरता स्थगित करण्यात आला असून, लवकरच पुढील नियोजन जाहीर करण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या निषेध मोर्चासाठी अंबरनाथ मंदिर भक्ती-शक्‍ती चौक येथून सुरुवात होऊन विष्णू मंदिर, सावतमाळी मंदिर, खोकुलाई देवी चौक, मीदत्त मंदिर चौक मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत मिरवणूक होणार होती. तथापि, मोर्चा स्थगित करून या घटनेच्या निषेधासाठी पुढील ठोस भूमिका घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रसंगी लोणी काळभोर  वि.वि.का. सोसायटी माजी व्हाईस चेअरमन संजय भालेराव, शिवसेना शिंदे गट पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे, दिगंबर जोगदंड, गोरख मोरे, श्रीकांत काळभोर, महेंद्र जैनजागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मिळून लोणी काळभोर पोलिसांना निवेदन सादर केले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबाबत अशा प्रकारची विटंबना सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तत्काळ दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला. या घटनेमुळे यवत परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून, राजकीय व सामाजिक स्तरावरूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजेंद्र पन्हाळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर. यांचे आवाहन…

लोणी काळभोर परिसरातील नागरिकांनी शांतता राखून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी यावेळी केले. या संदर्भात यवत पोलीस स्टेशन योग्य कारवाई करुन समाजात तेढ निर्माण करणार्यास हयगय करणार नाही.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??